shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वधूपिता सह पंधरा जणांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल..!!



(संचारबंदीच्या काळात लग्न करणे पडले महागात)

हिंगोली ।प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०९,सध्या राज्यासह तालुक्यात कोरोना महामारी चा प्रचंड उद्रेक वाढला असताना हिंगोली जिल्हाधिकारी  यांच्या आदेशाने  जिल्ह्यात  संचारबंदी  लागू असताना सुद्धा सेनगाव तालुक्यातील हत्ता(नाईक) येथे कोरोना महामारी चा गांभीर्य लक्षात न घेता संचारबंदी असून सुद्धा विनापरवाना लग्न लावणाऱ्या वधू व वर पीत्यासह पंधरा जणांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संपूर्ण राज्यात कोरोना महामारीचे बाधित रुग्ण प्रचंड वाढ होत असून अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या असून कोरोना महामारीचा जिल्ह्यात प्रतिदिन बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे आपल्या अधिकाराने जिल्ह्यात कोरोना महामारीची रुग्ण संख्या वाढू नये व कोरोना संसर्ग साखळीमध्ये खंड पडावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पहावयास मिळत आहे जिल्ह्यात जिल्हाधिकारी जयवंशी यांनी संपूर्ण जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश जाहीर केले असून या काळात संपूर्ण क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

यामुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा साथरोग प्रतिबंध कायदा फौजदारी सहिता यास कलम 144 लागू करण्यात आली आहे या कालावधीत जिल्ह्यात कुठलेही सार्वजनिक धार्मिक व राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे यासह लग्न समारंभ करता येणार नसल्याचे आदेशित करण्यात आले आहे परंतु केवळ नोंदणी पद्धतीने लग्न करण्याची परवानगी देण्यात आली असून तालुक्यातील हत्ता नाईक येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंध कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 प्रतिबंधित क्षेत्र घोषित असताना आता येथे दि 8 मे रोजी विनापरवाना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून विवाह सोहळा करीत असल्याची माहिती तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना कळताच त्यांनी तात्काळ मंडळाधिकारी अल्लाबक्ष इम्मम तलाठी गौस खान पठाण यांना फोन द्वारे आदेशित करून अवैध लग्न सोहळा आयोजित करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्याने तलाठी व मंडळाधिकारी यांनी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्या पथकाने लग्न स्थळी छापा टाकून विना प्राण विनापरवानगी व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वर वधूपिता सह पंधरा जणांना ताब्यात घेऊन यामध्ये वधूपिता  बाजीराव बालाप्रसाद गडदे,  सविता गडदे,  नामदेवराव पंडितराव शिंदे,  राहुल शिंदे, आनंदराव गडदे, गणेश काचगुंडे, सुभानराव देवकते,  अंबादास गडदे,  अशोक काचगुंडे, बाळू देवकते,  विलास गडदे,  बालाप्रसाद गडदे,  अनिल चक्के, शेख इनुस,सचिन कुलकर्णी  त्यांच्यावर विविध कलमाने सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या सूचनेनुसार तहसीलदार  जीवककुमार कांबळे यांच्या आदेशाने पोलीस  निरीक्षक कृष्णदेव पाटील पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे पोलीस कर्मचारी लेकुळे रमेश कोरडे चिंतारे मंडळाधिकारी अल्लाबक्ष  इमम तलाठी पठाण यांचं पथकांनी कारवाई करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील हे करीत आहे.
close