shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिचोंडी पाटिल येथील कोंविड सेंटर गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना..!

चिचोंडी पाटिल येथील कोंविड सेंटर गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना..!

नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
नगर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील या ठिकाणी Covid-19 अंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून या ठिकाणी 45 वर्षा पुढील नागरिक लस घेण्यासाठी उपस्थित राहतात तसेच या रुग्णालयामध्ये RT-PCR या टेस्टिंगसाठी रुग्ण येतात.     

यामुळे ग्रामीण रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी होत असून यातून Covid-19 चे संक्रमण वाढ़ू शकते असे ज्यावेळेस निदर्शनास आले त्यावेळी नगर तालुका पं.स.मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे,जेष्ठ नेते बाळासाहेब ठोंबरे, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन ठोंबरे,अंबादास कोकाटे यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ.नेवसे सर यांच्याशी टेस्टिंग साठी स्वतंत्र खोली देण्यासंदर्भात चर्चा केली.तसेच लसीकरणासाठी स्वतंत्र नोंदवही ठेऊन अनुक्रमाप्रमाणे लसीकरण करावे. व नागरिकांना क्रमांकांनुसार वेळेचा अंदाज येईल व त्यांचा वेळ वाचणे शक्य होऊन होणारी गर्दी कमी करून निर्माण होणारा गोंधळ दुर होण्यास मदत होऊ शकते. यासंदर्भात मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांनी वैद्यकीय अधिक्षक यांचेशी चर्चा केली.

या सर्व सुचनांना सकारात्मक प्रतिसाद देत वैद्यकीय अधिक्षक डॉ.नेवसे यांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
close