shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड मध्ये महिला पोलीस नाईक रश्मी स्वप्नील धावडे यांना राष्ट्रीय खेळात प्रावीण्य बद्दल मा.पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य यांचे बोधचिन्ह व सन्मानपत्रक..!!


पिंपरी चिंचवड:-महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय/प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक / पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस ना अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह / सम्मानचिन्ह प्रदान केले जाते.


मा. श्रीमती रश्मी स्वप्नील धावडे पोलीस नाईक विशेष शाखा पिंपरी चिंचवड पोलीस  मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचा पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बदल. तसेच राष्ट्रीय खेळामध्ये यश संपादन केल्याने पोलीस दलात अतिशय उत्कृष्ट समजला जाणारा पोलीस पदक मिळाले आहे. माननीय पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह 1 मे महाराष्ट्र दिनाच्या औचीत्याने प्राप्त झाले आहे.

या त्यांच्या शौर्याचे कौतुक व गौरव सर्व खेळाडू, ,पोलिस खात्यासह, देशात,राज्यात होत आहे.

त्यांनी आजपर्यंत केलेले  शौर्य कार्य..!
पिस्तूल नेमबाजीमध्ये त्यांनी २००९ पासून पोलीस संघाकडून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गन फाॅर ग्लोरी प्री नॅशनल या राष्ट्रीय स्तरावरील २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी राैप्य पदक मिळवले. २०१२ मध्ये गरोदर असताना रश्मी यांनी पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या ऑल इंडिया पोलीस शुटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेत सहभाग घेत चमकदार कामगिरी केली होती. बालेवाडी येथे २०१९ मध्ये ऑल इंडिया पोलीस शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांघिक गटातून कांस्य पदक पटकावले. तसेच वैयक्तिक गटातून चाैथा क्रमांक मिळवला होता.

इतर संघटनांच्या वतीने व  "शिर्डी एक्सप्रेस" चे संपादक रमेश जेठे ,बॉक्सिंग चे प्रशिक्षक मा. बळवंत सुर्वे ,मा.स्वप्नील धावडे ,मा.राहुल धोत्रे (आंतरराष्ट्रीय खेळाडू) त्यांच्या शौर्याचे कौतुक व अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
close