shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"रेनायसेन्स स्टेट" या पुस्तकावर बंदी साठी मुख्यमंञी ठाकरेंना निवदेन...!


प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई-एका नामांकित वृत्तपञाचे  संपादक गिरिश कुबेर यांनी लिहलेल्या "रेनायसेन्स स्टेट" या पुस्तकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे.तसेच छञपती संभाजी महाराजांविषयी इतिहासाची मोडतोड करून विविध आक्षेप घेत मराठाच्या इतिहासाची बदनामी करण्याचा डाव आखला असल्याचे दिसते.

 यामुळे महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत राष्ट्रीय क्षञिय जनसंसदचे सभापती महेश पाटील बेनाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिव छावा शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदिपराजे दरंदले पाटील यांनी महाराष्ट्राचे  मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदना द्ववारे या पुस्तकावर बंदीची मागणी केली आहे.

याबाबत गेल्या काही दिवसा पुर्वी महाराष्ट्रातील एका नामांकित वृत्तपञाचे संपादक गिरिश कुबेर यांनी 'रेनायसेन्स स्टेट' हे मराठांच्या इतिहासावर पुस्तक लिहले.यात त्यांनी छञपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तर केलाच पण संभाजी महाराजाविषयी इतिहासाची मोडतोड करून आपले मत मांडले आहे.लेखन स्वांतञ्या बद्दल सगळांना मुभा आहे पण जर कोणी आपल्या दैवतावर जर शिंतोडे उडवत असेल तर गप्प का राहवे.छञपती संभाजी महाराज यांनी अष्टप्रधान मंडळ व सोयराबाई यांना खुप ञास दिला असा उल्लेख यात केला असुन छञपती संभाजी महाराज यांच्याकडे परराष्ट्र धोरण नव्हते  असे मत मांडले आहे.

छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेबाबत मोठा त्याग  छञपती घराण्याचा असुन इतिहासाची मोडतोड करून केलेल्या बदनामी बद्दल महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या असुन या कृत्याबद्दल गिरिश कुबेर यांनी माफी मागावी.तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे हे शिवप्रेमी असुन त्यांनी या पुस्तकाचा अभ्यास करून यावर बंदी आणावी अशी मागणी राष्ट्रीय क्षञीय जनसंसदचे सभापती महेश पाटील बेनाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिव छावा शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदिपराजे दरंदले पाटील यांनी केली आहे.

यावेळी इतिहासाचे अभ्यासक प्रा.सचिन तुवर सर उपस्थित होते.सोनई येथील कामगार तलाठी दिलिप जायभाय साहेब यांना निवेदना द्ववारे निषेध व्यक्त करत शिवप्रेमींच्या भावना मुख्यमंञ्याकडे पाठवण्यात आल्या.
close