shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"विश्वास" .. कविता



"विश्वास" .. कविता

वट  पौर्णिमेचा सण
दिवस भलता खास
धागा गुंडाळे वडास
पतिच्या गळा फास

नवीन कपडे दागिने 
वेगळा असे उल्हास 
सवाष्णिला देईवाण
पक्वान्ननैवेद्य देवास

उतरून  गेला चेहरा
बायको करे उपवास 
संपू   लागला नखरा
तोंडास नसता  घास 

माहीत नाही कुणास
मीही  केला उपवास 
सात जन्म हीचं हवी
असाचं  हवा विश्वास 

- हेमंत मुसरीफ पुणे
  9730306996..
www.kavyakusum.com

२)
माॅड पौर्णिमा ..

वट  पौर्णिमा  आली 
कुंडीत वडाचाफाटा
सिमेंटी  जंगलामध्ये
नवीन  मिळती वाटा

उपवास अति कडक
पोटा काढला चिमटा
डायट होई  अनायसे
आराम  मिळे   पोटा

संस्कृती तशीचं आहे
प्रवाह जरी हा उलटा
पतिपत्नी प्रेम  तसेचं
मार्ग  जरा   उरफाटा

- हेमंत मुसरीफ पुणे
  9730306996..
www.kavyakusum.com

३)
बुध्द जयंती ...

लाॅकडाऊनकाळात
घरात सगळे निवांत
दगदग ना धावफळ
मिळालीजरा एकांत

गौतम बुद्ध  साहित्य
संपदा अमोल अनंत
वाचून समजून  घेऊ
चिंतन   मंथन  शांत 

दहा  पारमिता  पहा
गळेलं  क्षणात  खंत
अष्टांगिकमार्गे जाता
मिटेलं  जीवना भ्रांत

जपावा पंचशीलमंत्र
चांगली  लाभे  उसंत
बौध्द  विचार धारेचा
निर्झर वहावा जिवंत 

परिवारासहीत  चर्चा
सगळेचं होऊ श्रीमंत
जयंती  साजरी  घरी
मिळेल आनंदअत्यंत

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
www.kavyakusum.com


close