shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका सर्वपक्षीय शेतकरी कृती संघर्ष समितीच्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिले निवेदन..!!

इंदापूर तालुका सर्वपक्षीय शेतकरी कृती संघर्ष समितीच्या वतीने  खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिले निवेदन..!!


इंदापूर प्रतिनिधी:

मुंबई येथे इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी कृती संघर्ष समितीच्या वतीने (दि. २५)रोजी खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

सर्वप्रथम खासदार या नात्याने सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यांना इंदापूर तालुक्यातील गेली पन्नास वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण या भागाचे प्रतिनिधी म्हणून या मध्ये लक्ष घालावे व रद्द केलेला निर्णयाचा पुनर्विचार केला जावा अशी मागणी यावेळी केली. असून उजनी धरणातील सोलापूर च्या वाट्याचे एक थेंबही पाणी आम्हाला नको परंतु पुणे व पिंपरी-चिंचवड भागातून येणारे सांडपाणी आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आपण लक्ष घालावे अशी मागणी आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.

भविष्यातही आम्ही पाणीप्रश्‍नावर शांत राहणार नसून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे सर्वपक्षीय शेतकरी कृती संघर्ष समितीच्या वतीने सांगितले. अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी दिली.
या वेळी हनुमंत कोकाटे,अतुल झगडे, प्रतापराव पाटील, बाळासाहेब करगळ,दत्तात्रेय घोगरे,गणेश झगडे,नवनाथ रुपनवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
close