shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संस्थाचालकाच्या समर्थनार्थ ईतर कर्मचाऱ्यांनीही उपसले साखळी उपोषणाचे हत्यार..!!


=================
 प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-      
पाथरा , ता.केज .येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ( आनुजाती) माध्यमिक निवासि आश्रम शाळा पाथरा .ता.केज हि शाळा इ.स.1998 साली चालू केली तेव्हा पासून 14,फेब्रुवारी 2006, रोजी मान्यता मिळाली , तेव्हा पासून 8/03/2019 , 20%अनुदान जाहिर झाले , तरी आत्ता पर्यंत एक रूपयाचे हि अनुदान नाही . 

परंतु सहाय्यक आयुक्त श्री , सचिन मडावी  कार्यरत झाल्यापासून तसेच प्रादेशिक उपायुक्त औरंगाबाद यांनी मा.उच्च न्यायालय औरंगाबाद क्र .write peititon no . 14774, Of 2019 , दि .17/02/2020 प्रमाणे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना संस्थेचे , कुठलेहि तोंडी व लेखी पुरावे ग्रहित न धरता अन्याय कारक दिलेला निकाल 23/03 /2021चा.हा आदेश व निकाल तात्काळ रद्द करावा , तसेच शाळा स्थापन झाले पासून कुठलेहि शिक्षकांना टाचन वह्या दिलेल्या नसताना निवेदन कर्ते यांनी बनावट व यु-डायस मध्ये दर्शवलेली  नावे ग्रहित धरून दिलेला निकाल रद्द करुन संबंधितावर तात्काळ कार्यवाही करून अटक करावी , 

तसेच आनुसुचित जातिंच्या संस्था चालकावर जातिय सुडभावनेतून होनारा अन्याय थांबवून संरक्षण द्यावे , व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आनुसुचित जाती )माध्यमिक (निवासि )आश्रम शाळा पाथरा ता.केज जि.बिड शाळेला तात्काळ 2006,सह 100%अनुदान द्यावे , तसेच या शाळेतील कर्मचाऱ्यांनी एक रुपयाचे अनूदान न घेता ज्ञानदानाचे काम केले आहे , त्यांना आजपर्यंत चे 100%वेतन द्यावे या मागणीसाठी , सचिव व संस्थाचालक श्री , लहू बनसोडे हे आमरण उपोषणास बसले आहेत.                                 

त्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी संस्थेतील ईतर २० कर्मचारी देखील साखळी पद्धतीने उपोषणास बसले आहेत  . तसे निवेदन ही त्यांनी केज तहसील कार्यालयात दिले आहे.

पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा संस्थाचालक आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बऱ्याच वर्षा पासून झगडतो आहे, परंतू या अनुसुचित जातीच्या संस्थाचालकावर जाणूनबुजून जातीय सुड भावनेतून होणारा अन्याय थांबवून संबंधीत प्रशासनाने न्याय द्यावा व विनाअनुदान ज्ञानदानाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा, तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना चुकिचा दिलेला आदेश रद्द करून संबंधीतावर योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. 
close