shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धुरंधर आणि धुव्वाधार कार्यकर्ता! पंडितआप्पा दरेकर(पुणे जि.नियोजन समिती सदस्य)



प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी

शिरूर—हवेलीचे लोकप्रिय  तथा कार्यसम्राट आमदार, सन्माननीय ॲड्.अशोकबापू पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते तथा कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.

कार्यकर्ता कसा असावा तर पंडितआप्पा दरेकर यांच्या सारखा. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तन, मन, धन आणि स्वतःला झोकून देऊन काम करणारा सक्रिय, सर्वांच्या पुढे, राजकीय, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा एक दिलदार, दानशूर युवा कार्यकर्ता.

आज कोरोनाच्या भयंकर परस्थितीत बापू आणि भाभी यांच्या बरोबर ते काम करताहेत, मदतीचा हात देताहेत. आपल्या लग्नाच्या वाढदिवशी राव'लक्ष्मी फाउंडेशनला मोठी देणगी दिली. आणि काल बापू आणि भाभींच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पाच प्रतिभा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवण दिलं. सामाजिक बांधिलकी जपण्यात ते कधीच कमी पडत नाहीत.

आपल्या नेत्यासाठी जीव ओतून काम करण्याची, जीव ओवाळून टाकण्याची तयारी. असा पंडितआप्पा दरेकर यांच्या सारखा कार्यकर्ता शिरूर—हवेलीच्या राजकीय पटलावर होणे नाही.
close