shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुईछत्तीसी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसिकरण नियोजन..!



-लसीसकरणाचा दुसऱ्या डोस साठी आधुनिक तंत्रज्ञान वापर करुन लसिकरण कँप यशस्वी*

नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
नगर तालुक्यातील रुईछत्तीसी प्राथमिक आरोग्य केंद्रवर वैद्यकीय अधिकारी सविता ससाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या डोसचे लसिकरण देण्यात आले. यासाठी माजी उपसभापती रवींद्र भापकर यांच्या पुढाकारातून व विजय खाकाळ यांच्या संकल्पनेतून गावातील जेष्ठ नागरिकांच्या दुसर्‍या डोस साठी स्वतंत्र ऍप बनववण्यात आले. याद्वारे ऑनलाईन नोंदणीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 लोकांना यामुळे आता रांगेत उभा राहाण्याची गरज नसून घरीच आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे.याबरोबरच ज्यांना शक्य नाही अशा लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रुईछत्तीसी येथे ऑफलाइन सुविधाही उपलब्ध केली आहे. यामध्ये एका बॉक्स मध्ये लाभार्थ्यांनी आपले नाव, पाहिला डोस तारीख, मोबाईल नंबर आदींची नोंद असलेली चिट्ठी जमा करायची आहे. त्यामुळे ज्यांच्या नावांची नोंद झाली अशा लोकांनाच लसी साठी बोलावले जाणार आहे. 

या अनोख्या फंड्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी व गोंधळ टळणार आहे. रुई छत्तीसी येथील नागरिकांचा या पद्धतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून अत्ता पर्यंत अनेक  नागरिकांनी  आपल्या मोबाईल वरुन ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे. या‌वेळी पंचायत समिती उपसभापती रविंद्र भापकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, श्रीकांत‌ जगदाळे ,सोमनाथ गोरे, सोमनाथ ‌कुटे, विलास लोखंडे, विनायक पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
close