प्रतिनिधी- मोहन शेगर:-
सोनई :- सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रातुन चोरून बाहेर लस दिली जात असल्याने काल सोनईत प्रंचड खळबळ माजली.सामाजिक कार्यकर्ते यांनी याबाबत सोनई पोलिसात तक्रार दाखल केली असुन नेवासा तहसिलदार व आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत चौकरी सुरू केली आहे.
सोनईतील गोर गरीब नागरिक घरातील जेष्ठ नागरिकां घेऊन सरकारी आरोग्य केंद्रावर अगदी पहाटे पासुन लसीकरणा साठी लोक येऊन बसतात.आपले नंबर लावतात.शंभर डोस दिले जात असताना रोज तीनशे चारशे लोक आरोग्य केंद्रावर येऊन ञास सहन करत बसत आहे.तसेच सोशल डिस्टन्सचा पण फज्जा उडत आहे.याबाबत तर कुठलेही नियोजन आरोग्य केंद्राचे नाही.बिचारे नागरिक जिवाच्या भितीने आपल्याला लस कधी मिळणार यांची वाट पाहत दिवसभर ताटकळत बसतात.शंभरचा कोटा पुर्ण झाल्याचे सांगितले जाते.
माञ आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांच्या मार्फत प्रतिष्ठितांना केंद्रा बाहेर लसीकरणासाठी लस उपलब्ध करून दिली जाते!याबाबत सोनई पोलिसात येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल निमसे यांनी तक्रार दाखल केली असुन योग्य यंञणेमार्फत चौकशीची मागणी केली असता पोलिसांनी तहसिलदार,तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी,बिडिओ यांच्याकडे चौकशी सुपुर्द केली आहे.
सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल निमसे यांनी म्हटले आहे,, कि गेली चार दिवसा पासुन आईला घेऊन सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जात आहे.पण लस शिल्लक नाही असे दरवेळी सांगितले.गुरूवारी परत ते सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता आरोग्य अधिकारी डाॅ.कसबे यांनी शंभर लसीचा आजचा कोटा संपला असल्याचे त्यांना सांगितले.पण थोडया वेळाने त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला असता तेथील आरोग्य कर्मचारी जावळे यांना त्यांनी कोविड लसीकरणाचा बाॅक्स घेवुन शनिशिंगणापुर येथे जायचे सांगितले.
मी आणि सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर यांनी जावळे यांचा पाठलाग केला असता ते शनिशिंगणापुर भोजनालय येथे गेले.आपल्या गाडीवरील बाॅक्स काढुन तेथील डाॅ.वाघ यांच्या कडे दिला.त्यांनी तेथील कार मधील महिलेला सिरिंज दिल्याचे अनिल निमसे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना सदर प्रकार सांगितला असता त्यांनी सोनई पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास सांगितले.सोनई पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक रामचंद्र करपे यांनी तक्रार दाखल करून घेत सदर तपास तहसिलदार,बि.डि.ओ,तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिला आहे.
सदर तालुका कोरोना नियंञण समिती लसीचा कोटा किती आला व किती दिला गेला.यांची चौकशी करणार असल्याचे सहा.पोलिस निरिक्षक करपे यांनी सांगितले.सदर आरोग्य अधिकारी यांच्या कारभारा बाबत सोनईत पुर्वी पण अनेक नागरिकांनी तक्रारी व्यक्त केल्या आहेत.पण कुठला राजकिय वरदहस्त आहे का अनेक तक्रारी असुन ही कुणीच दखल घेत नाही हे जनतेला पडलेले कोडेच आहे
याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर यांनी आरोप करताना सांगितले आहे कि आम्ही ग्राम कोरोना नियंञण समितीला लसीचा कोटा चेक करण्यास सांगितले तर त्यांनी येण्यास नकार दिला.आम्ही आज सकाळी दहा वाजता सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा कोटा चेक करण्यास गेलो असता सदर आरोग्य अधिकारी डाॅ.कसबे यांनी आम्हाला आत येण्यास मज्जाव केला आणि दबाव आणला.परत काही तासांनी आम्हाला परत बोलावले.याचा अर्थ त्यांनी लसीच्या कोटयात काही काळेबेरे तर केले नाही ना याची योग्य ती चौकशी व्हावी आणि गोर गरीब लोकावर लसीकरणा बाबत होणारा अन्याय थांबवावा"
तहसिलदार रूपेश सुराणा व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.अभिराज सुर्यवंशी यांना चौकशी बाबत विचारले असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली.

