shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रत्नागिरी संगमेश्वरातील संभाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे..! असंख्य जनतेची ही हाक आहे माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये..!



राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी -
रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा असा आहे की इथे विसरभोळेपणा जास्त आहे.1995 च्या दरम्यान महाराष्ट्रात युतीचे शासन होते.तेव्हा काही स्थानिक पुढाऱ्यांना सुबुद्धी सुचली.

हिमालयाएवढे शौर्यअसलेले,महापराक्रमी,धर्मवीर, स्वराज्यरक्षक,शिवपूत्र,छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक संगमेश्वरला उभारावे.असे ठरले.त्यादृष्टीने पटापट हालचाली झाल्या. जागा निश्चित झाली.कामाला सुरवात झाली.सरकार बदलले.स्मारक अर्ध्यावर राहिले.आता गर्द झाडीत खाणाखुणाही आटपल्यायत......पार चिंध्या झाल्यायत ....संभाजीराजे म्हणजे धगधगते हिंदूत्व.अनेक शतके येतील जातील पण राजेंचे विस्मरण होणार नाही.

हे तेज कधीच झाकले जाणार नाही.संभाजी महाराजांची  आज जयंती.या निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा करीत असतानाच त्यांच्या शौर्य कथेत कोकणातील संगमेश्वरला महत्त्व दिले गेले आहे.हे आठवले आणि त्यांच्या नियोजित  स्मारकाचा विषय मनात आला.

इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या राजेंच्या स्मारकाच्या पूर्णत्वाला मुहुर्त इतक्या वर्षात मिळू नये ही शोकांतिका आहे.यासाठी संगमेश्वरवासीय नागरिक,सामाजिक संस्था,पत्रकार सर्वांनी लक्ष वेधले.आमदारकीच्या बोहल्यावर चढतांना अनेकांनी हे स्मारक उभारण्याची ग्वाही दिली.पण ते आश्वासन ठरले...

संगमेश्वरात पांडव कालीन मंदिरे आणि खूप काही ईश्वरी निर्मित ठिकाणे आहेत.असंख्य पर्यटक जेव्हा जेव्हा इथे येतात तेव्हा तेव्हा संभाजी राजेंचा उल्लेख झाल्यावाचून रहात नाही. भव्य स्मारक व्हावे.राजेंचे स्मरण नित्य व्हावे.ही प्रत्येक हिंदूभिमानी नागरिकांची मागणी आहे.ज्यांनी इतिहास घडविला 'होय ! मी हिंदू आहे.शेवटच्या श्वासापर्यत राजेंनी हिंदूत्वाची झळ सोसली तीपण जिवंतपणी देहाचे छिन्नभिन्न तुकडे सोसत.'...... सारे नियोजित करुन केवळ अक्षम्य दुर्लक्षातून महापराक्रमी राजेंचे स्मारक होत नाही ही लाजिरवाणी तितकीच बेपर्वाईची बाब आहे...

 आजकाल समंजस लोकप्रतिनिधींचा अभाव असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.अशी काही मन खिन्न करणारी बाब पाहिली की हे पटू लागते.जातीच्या राजकारणात अनेकांना रस दिसतो पण जातीच्या बेड्यांबाहेर एका धर्मवीर स्वराज्यरक्षकाचे स्मारक अनिर्णित रहाते याचे यांना काही वाटत नाही.याचा मनापासून खेद होतो.

आमच्या लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर स्वतःच्या ताकतीवर हे स्मारक उभारु शकतात.फक्त इच्छाशक्ती हवी.संभाजीराजे अखिल हिंदू भुमीचा अलंकार आहे.ज्या महाराष्ट्रात शिवाजी राजेंवर जीव ओवाळला जातो त्याच महाराष्ट्रात शिवपूत्र संभाजी महाराज यांचे स्मारक जिल्ह्यातील संगमेश्वर येथे रखडले जाते हे शोभनीय नाही.

हिमालयाएवढे शौर्य असलेल्या छत्रपती संभाजीराजें आमचे दैवत आहे.आज त्यांची जयंती आहे.त्यांच्या स्मारकाच्या पूर्णत्वासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना ही हाक आहे.पुढील जयंतीच्या पूर्वी हे स्मारक पूर्ण करण्याचे आव्हान कोणता आमदार घेतो याकडे आता लक्ष आहे...!
 
काही असो ! स्मारक झालेच पाहिजे...... तुम्हाला काय वाटते ? 
       बाबा ढोल्ये✒️
        जेष्ठ पत्रकार रत्नागिरी
close