नगर प्रतिनिधी( शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील रहिवासी इंदुमती डोळस, घनश्याम डोळस,अनिकेत डोळस,गावठाण हद्दीतील वहिवाटी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने जाण्या येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. एक दोन इसमांनी दंडीलशाहीने अतिक्रमण केले आहे ते काढण्यासाठी शिंगवे नाईक ग्रामपंचायत कार्यालय कडे गेल्या दोन वर्षांपासून तक्रार अर्ज स्मरणपत्र अशा कायदेशीर व ल़ोकशाहि मार्गाने पत्रव्यवहार चालू होता.
पण गेल्या दोन वर्षांपासून शिंगवे नाईक ग्रामपंचायत आज पर्यंत या तक्रारीत संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई कार्यवाही सांधी चर्चा किंवा पत्रव्यवहार असे काही न केल्या मुळे हातश होऊन १ जुनं पासुन शिंगवे नाईक ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याची नोटीस तहसीलदार नगर, गटविकास अधिकारी नगर, पोलिस निरीक्षक पोलिस एम.आय.डी.सी पोलिस स्टेशन, आरोग्य अधिकारी ग्रामिण आरोग्य उपकेंद्र देहरे, कामगार तलाठी शिंगवे नाईक अशा विभागांना रितसर नोटीस बजावली आहे.जो पर्यंत वहिवाट रस्त्यावरील अडथळा काढत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषणाचा चालू ठेवु असे डोळस परिवाराने नगर "शिर्डी एक्सप्रेस" प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

