shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट प्रशासक होत्या - हर्षवर्धन पाटील

अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट प्रशासक होत्या  - हर्षवर्धन पाटील
   - इंदापूर येथे अहिल्यादेवींना अभिवादन
इंदापूर : प्रतिनिधी( दि.३१/५/२१)
           पुण्यश्लोक अहिल्यादेवी उत्कृष्ट प्रशासक होत्या. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे काम केले. महिला सक्षमीकरणाची  प्रेरणा राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रशासकीय कामातून मिळते , असे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.३१) काढले.
             इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर राजे यशवंतराव होळकर युवा संघ व तेजपृथ्वी ग्रुप यांच्या वतीने आयोजीत जयंती उत्सव कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. 
        यावेळी अहिल्यारत्न पुरस्काराने कोरोना काळात उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार या कोविड योद्ध्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
   हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले ,' अहिल्यादेवीनी  तळागाळातील उपेक्षित वर्गाला मदत करण्याचे काम केले. तसेच धार्मिक स्थळाच्या ठिकाणी धर्मशाळा, नदी घाट, मंदिरे इत्यादींची उभारणी करून समाजाला धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे काम केले. त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज पद्धतीचे इंग्रजांनीही  कौतुक केले होते, असे गौरवोद्गारही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
           तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई नानासाहेब खरात, राजे यशवंत होळकर युवा संघाचे मार्गदर्शक महेंद्र रेडके, आप्पासाहेब माने, नानासाहेब खरात, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते पोपट पवार, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शकील भाई सय्यद, माजी नगरसेवक शेखर पाटील, नगरसेवक जगदीश मोहिते, बापू जामदार, दादा पिसे, शिवाजी मखरे यावेळी उपस्थित होते.

close