पिंपरी चिंचवड:-मुलगी झाली म्हणून विवाहीत महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करुन नांदविण्यास नकार दिला. याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2020 ते 10 मे 2021 दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी पिडित महिलेनं गुरुवारी (दि.27) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती जगदीश नारायण मैलारफ (रा. परांडेनगर, दिघी), सासु लक्ष्मी नारायण मैलारफ (वय 55), नणंद सरस्वती (रा. हैद्राबाद) व नणंदचे पती श्रीनिवास (वय 40) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती आणि सासुने फिर्यादी यांना दुबईत मारहाण केली. घरातील कामे येत नसल्याचे सांगत दिराने शिवीगाळ करत मानसिक त्रास दिला. फिर्यादी यांच्या कडे अडीच लाख रुपयांची मागणी केली तसेच, पतीने वारंवार संशय घेतला व कोर्टात अटीशर्ती लिहून दे तरच घरात घेईन अन्यथा नाही असे सांगितले. फिर्यादी महिलेला मुलगी झाल्यानंतर पती आणि घरच्यांनी त्यांना नांदविण्यास नकार दिला. पोलीस उपनिरीक्षक शिखरे अधिक तपास करत आहेत.

