सांगली । प्रतिनिधि( अनिल पोवार ):
( मिरज )लॉक डाऊन मूळे अनेकजन हालाकित जीवन जगत आहेत. हाताला काम नाही, पैसा नाही , घरात धान्य कडधान्ये चे डबे तळ घाटले तर काहींचे रिकामे झाले. शासनाचे तूटपुंज मदत गेल्यावर्षी मिळाली पण, या वेळी ते ही नाही. सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था यानी ही पाटफिरवली. आई-वडिल, बायको- मुलांकडे पाहुन घरचा कर्ता पुरुष, मेटाकुटीस आलेले पाहुन, पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र महिला आगाडिच्या आध्यक्षा सौ उषा सौंदडेनी परिषदेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या कानावर घालून प्रत्येकाने आपल्या आर्थिक कुवत नुसार वर्गणी जमा करून संमता नगर मिरज येते मोलमजुरी,श्रमजीवी जगनार्या वर्गास मदतीचा खारीचा वाटा समजून धान्याची किट वाटले.
पुरोगामि संघर्ष परिषद ही आन्याया विरुद्ध लडनारी चळवळ आहे.मग समाज कोणताही असो,जिते आन्याय तिते आम्ही, संघर्ष करुंन न्याय देने हेच आमचे हेतू असे वक्तव्य किट वाटपाच्या वेळी पुरोगामि संघर्ष चे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे ने केली. सध्याचा काळ हा आटीतटीचा काळ आहे.कोविड 19 चा महामारी चा संकट सपुर्ण मानवजातीवर आला आहे. हे ही दिवस जातिल धीर- सयम सोडुनका असे परिषदे सांगली जिल्हाउपाध्यक्ष खंडू कांबळे म्हणाले. तर महिला आघाडी महाराष्ट्र अध्यक्षा सौ उषा सौंदडे सह इतर पदाधिकारी उत्साहवर्द्क भाषणं केलीत.
या वेळी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होतीत. सांगली शहर आध्यक्षा संगीता साठे,मिरज तालुकाध्यक्ष रतन लोखंडे ,महपालिकाक्षेत्र आध्यक्ष ज्योती गोकाक,कुपवाड़ शहर आध्यक्ष शुभांगी साळुंखे, मिरज तालुकाकार्याध्यक्ष सचिन साठे,अनिता गोकाक, पुरोगामि संघर्ष परिषद चे वरिष्ट उपाध्यक्ष सावाळा खुडे (आण्णा) इत्याधि पदाधिकारी सक्रियभाग घेऊन गरजवंताना मदत केली. सुनंदा आवळे ,पल्लवी कांबळे,संगीता चंदणे,सुशिला चौरीनाथ,ईमा कांबळे,प्रतिक्षा घोरपडे. आभार जिल्हा कार्यकरणी सद्स्या आश्विनी कांबळे यानी मानले.

