shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिगरबाज सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ यल्लाप्पा विटकर यांना माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे बोधचिन्ह व सन्मानपत्रक..!


मुंबई । प्रतिनिधी :-
महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय/प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक / पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह / सम्मानचिन्ह प्रदान केले जाते.
 
     सन्मा.स.पो.नि. दशरथ यलाप्पा विटकर

त्यामध्ये सध्या दहशतवाद विरोधी पथक जुहू, मुंबई, येथे एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या पथकात कार्यरत असलेले स.पो.नि.दशरथ यल्लाप्पा विटकर यांना माननीय पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह 1 मे महाराष्ट्र दिनाच्या औचीत्याने प्राप्त झाले आहे. 

त्यांनी आजपर्यंत केलेले  शौर्य कार्य..!

*आंध्रप्रदेश मधील सात लाख इनाम घोषित केलेले मोस्ट वांटेड नक्षलवादी आणि त्याच्या साथीदारांना  अटक केली.

*पाकिस्तान मध्ये काही दिवस राहून बाम्ब तयार करण्याचे ट्रेनिंग घेऊन आलेल्या इसमास अटक केली.

*पुण्यात अवैधरित्या चालू असलेल्या ड्रग्ज फॅक्टरी ला उद्धवस्त केले.सदर  फॅक्टरीमधील करोडो रुपयांचे ड्रग्ज पकडून जप्त करण्यात आले.

*उत्तर प्रदेश पोलीस फायरिंग केस मधील मुख्य आरोपी विकास दुबे च्या साथीदार यास मोठ्या शिताफीने अटक केली.

*माननीय मुख्यमंत्री साहेब व खासदार संजय राऊत तसेच इतर बड्या नेत्यांना  धमकी देणाऱ्या इसमास कोलकता येथे पकडून अटक केली.



या आणि अशा अनेक शौर्याच्या कार्याबद्दल सपोनि दशरथ यल्लाप्पा विटकर यांना अनेक बक्षिसे बहाल करण्यात आलेली आहेत.

तसेच कर्तव्य दक्ष जिगरबाज सपोनि दशरथ विटकर यांनी अनेक क्लिष्ठ आणि थरारक गुन्ह्यांची उकल करून खटले कोर्टात दाखल केले आहेत. 

या त्यांच्या शौर्याचे कौतुक व गौरव पोलिस खात्यासह, देशात,राज्यात होत आहे.

तसेच वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य,व इतर संघटनांच्या वतीने व   "शिर्डी एक्सप्रेस" चे संपादक रमेश जेठे, सितारामजी शिंदे,जगन्नाथ फुलारे,भाऊलाल पवार, रामचंद्र मंजूळे, डाॅ.श्रावण रॅपनवाड, अशोकराव कुलाल, महादेव कुसळकर, संजय देवकर, दिलीप गुंजाळ, बी.के.गायकवाड, डाॅ.लक्ष्मण बामणे, कैलास पवार, मनोहर विटकर , जगन्नाथ डुकळे, प्रा.श्रीकांत मुद्दे व समाज बांधव यांनी त्यांच्या शौर्याचे कौतुक व अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
close