जळगाव जिल्हा प्रतिनिधी। एरंडोल
प्रमोद चौधरी
9960595807
एरंडोल येथे दिल्या जात असलेल्या लसीकरणात तालुक्यातील व शहरातील नागरिक वंचित राहत असल्याचे एरंडोल तालुका मनसे व शहर मनसे तर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी स्वीकारले. निवेदनात गेल्या चार पाच दिवसापासुन एरंडोल या ग्रामीण भागात कोविड -१ ९ चे लसीकरण सुरु करण्यात आले आहे परंतु सदर लसीकरणापासुन एरंडोल शहर व एरंडोल तालुक्यातील ग्रामस्थच वंचित राहुन जळगांव व इतर भागातील नागरीक लसीकरणाचा फायदा घेत असल्याचे म्हटले आहे तसेच एरंडोल शहर व एरंडोल तालुक्यातील नागरीक यांना ऑनलाईन प्रक्रिया ही ग्रामीण भाग असल्यामुळे व अशिक्षीत व अडाणी लोक जास्त असल्यामुळे समजत नाही.
त्यामुळे एरंडोल व तालुक्यातील लोक मोठया प्रमाणावर लसीकरणपासुन वंचित राहुन कोरानाचा मोठया प्रमाणावर धोका वाढण्याची भीती बाळगली आहे व एरंडोल या ठिकाणी एरंडोल शहर व एरंडोल तालुक्यातील लोकांना ऑनलाईन प्रक्रियेबाबत माहिती देवुन त्याची ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी अशी विनंती करण्यात आली असुन तालुक्यातील व शहरातील नागरिकांना १०० टक्के प्राधान्य देण्यात यावे असे म्हटले आहे.तसेच काही राजकीय व चमकोगिरी करणारे नागरिक मागील दारातून आपला वशिला वाले नागरिक यांना लस दिली जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे असे सामान्य नागरिकांनी बोलून दाखले आहे.
निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार,शहराध्यक्ष गोकुळ वाल्डे,इंद्रनील पाटील,मुकेश महाजन,उपाध्यक्ष ओमकार पाटील,विखरण विभाग अध्यक्ष गणेश जाधव.

