shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री. व्हि टी पाटीलसरांच्या सकंल्पनेतुन covid -19 साठी निधी सकंलनाचे काम पुर्णत्वास..!!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी/एरंडोल
प्रमोद चौधरी
9960595807

एरंडोल तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बाधंव भगीनी व एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघ , एरंडोल तालुका माध्यमिक शिक्षक संघटना, एरंडोल तालुका टीडीएफ संघटना, एरंडोल तालुका माध्यमिक शिक्षक भारती संघटना, तसेच एरंडोल तालुक्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, एरंडोल तालुक्यातील सर्व संघटना यांनी श्री व्हि टी पाटीलसरांच्या सकंल्पनेतुन covid -19 साठी निधी सकंलनाचे काम पुर्णत्वास आणलेले होते त्या निधीतुन आँक्सीजन सिलिंडर खरेदी केलेली आहेत.

त्याचे लोकार्पणासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णनालयात देणगीदार बांधव,भगीनी यांनी आज दिनांंक 8/5/2021 (शनिवार ) संध्याकाळी 5:00वा .उपस्थित राहुन लोकार्पण केले आहे.

सदर कार्यक्रसाठी मा.श्री.प्रातांधिकारी विनय गोसावी साहेब, श्री दादासो  डाँ.कैलास पाटील ,श्री डॉक्टर मुकेश चौधरी, माननीय श्री शालिक भाऊ गायकवाड, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष 
श्री अमितदादा राजेंद्र पाटील ,म.ध. पाटील माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष श्री जगदीशबापू पाटील
,डॉक्टर श्री राजेंद्र आबा चौधरी, एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील सर, माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री व्हि टी पाटील सर, श्री एम के अण्णा मराठे सर, श्री आर झेड पाटील सर, श्री अहिरे सर ,श्री अनिल पाटील सर, श्री महेंद्र पाटील सर, शिक्षक भारती एरंडोल तालुका अध्यक्ष शेखर पाटील सर, तसेच सर्व शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांची लोकार्पण ठिकाणी उपस्थिती होती.
       
 आपलॆ नम्र.
 ( covid -19 )
निधी सकंलन समिती एरंडोल.
close