जाहिर निषेध ! जाहिर निषेध !
प्रतिनिधी । संजय वायकर :
अ नगर (दि .३० ) : मराठवाड्यातील लोकपत्र या दैनिकातुन संपादकीय लेखात
सर्व शिक्षक समुदायचा अपमान होईल अशा आशयाचा संपादकीय लेख लिहणाऱ्या संपादकाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे जाहीर जाहीर निषेध करून संपादकीय लेखाची होळी करण्यात आली.
याप्रसंगी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महीला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी ,सौ. रंजनाताई कावळे, सुधीर वारकर, हेमंत बेलखोडे व इतर पदाधिकारी यांनी जाहीर निषेध केला.
शिक्षक परिषदेच्या अहमदनगर च्या सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व सर्व मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर बंधू भगिनिंच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आल्याचे श्री .बाबासाहेब बोडखे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ,अहमदनगर यांनी सांगितले .

