shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारताची जगात प्रतिष्ठा उंचावण्याचे काम मोदींनी केले - हर्षवर्धन पाटील

भारताची जगात प्रतिष्ठा उंचावण्याचे काम मोदींनी केले - हर्षवर्धन पाटील
   - इंदापूरात कोरोना योद्ध्यांचा सन्मान
 इंदापूर:प्रतिनिधी (दि.३०/५/२१)
           पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अष्टपैलू नेतृत्व असून त्यांनी जगात भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले असून, आपल्या देशाचा दबदबा जगामध्ये वाढविला  आहे. त्यांनी क्रियाशील पंतप्रधान म्हणून जगात कर्तुत्वाने ओळख निर्माण केली आहे. कणखर पंतप्रधान कसा असतो याचा आदर्शही त्यांनी घालून दिलेला आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याचे कौशल्य पंतप्रधान मोदीजींनी भारतवासीयांना वेळोवेळी दाखवून दिलेले आहे, असे प्रशंसोद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे रविवारी (दि.30) भाजपच्या वतीने आयोजित कोरोना योद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमात काढले.
                  पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने ३० मे २०२१ रोजी सत्तेची सात वर्षे पूर्ण केली, याचा आनंद देशभर साजरा केला जात आहे. देशावर व राज्यावर सध्या कोरोनाचे सावट गोंगावत असल्याने विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमातून कार्यकर्ते मोदींना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत आहेत. इंदापूर मध्ये भाजपा नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते  कोरोना काळात जीवाची बाजी लावून या परिस्थितीचा सामना करणाऱ्या कोरोना योध्द्यांचा सन्मान करण्यात आला.
           हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न,खतावरील अनुदान,शेतकरी सन्मान योजना,उज्वल गॅस योजना किंबहुना कोरोनाच्या काळातही जगातून भारताला मदत आली त्याचे एकमेव कारण म्हणजे या देशाचा पंतप्रधान एक कणखर नेता आहे, हेच होय. म्हणून त्यांच्या पंतप्रधान कार्याला मी शुभेच्छा देतो, पुढचा काळ ते यापेक्षा अधिक गतीमानतेने नेतील.
                कोरोना महामारीच्या काळात इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी,तालुका आरोग्य विभाग,रुग्णवाहीका चालक, आशासेविका,अंत्यविधी करणारे आदींनी तुटपुंजी यंत्रणा,मर्यादित कर्मचारी व कामाचा प्रचंड ताण असतानाही त्यावर मात करीत या सर्व कोवीड योध्द्यांनी जी सेवा बजावली त्याची नोंद इंदापूर तालुक्याच्या इतिहासात कायम ज्वलंत राहील. तुम्ही या कोरोना महामारीच्या युध्दात कसे लढला याचे गोड आणि कटू अनुभव एका पुस्तकात रेखाटून तो संग्रह तालुक्यातील प्रत्येक उंबरठ्यावर पोहचवून तुमच्या कार्याला सलाम केला जाईल,  अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली. 
         इंदापूर शहरातील श्रीराम मंदीरात मंदिरात आयोजित सत्कार कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अंकुश बळगानुरे,उज्वला सुरेश कदम,वृशाली अरविंद नवगिरे, मोनाली चव्हाण,उर्मिला शेंडे,शुभांगी शिंदे, पुनम निंबाळकर,सुर्वणा कुलकर्णी,सुमन मदने,राहुल जाधव,रमेश टुले,गणेश घाडगे, नितीन खिलारे,भगवान भोसले,अल्ताफ मोमीन, नसिर मोमीन यांना कोरोना योध्दा म्हणून तसेच कोरोनावर मात करून आलेले 85 वर्षाचे जनार्दन राऊत यांचा  सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
           भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार, शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रघुनाथ राऊत, प्राचार्य संजय चाकणे,गोरख शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी तर आभार नगरसेवक कैलास कदम यांनी मानले.

close