shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयास आणखी निधी देणार ...आमदार बबनराव पाचपुते..!



दादांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन केली पाहणी ...!

प्रतिनिधी । संजय वायकर :

नगर (दि.२३) : श्रीगोंदा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.श्री.बबनदादा पाचपुते साहेब यांनी आज चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी दादांच्या आमदार निधीतून देण्यात आलेली रुग्णवाहिका, डिजिटल एक्सरे मशीन व २० ऑक्सिजन बेडची पाहणी  करण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालयातील काही सुख सुविधांसाठी दादांना निधीची मागणी केली. लवकरच ती मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दादांनी दिले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोजभाऊ कोकाटे, दशमी गव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे, जेष्ठनेते बाळासाहेब ठोंबरे, उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नेवसे सर, डॉ.कांबळे मॅडम यांच्यासह विजय गाडे, बाप्पू कोकाटे, संतोष कोकाटे, जीवन कांबळे, अक्षय नालकुल, बालू बोरुडे, सागर खडके, तुषार कोकाटे आदी उपस्थित होते. .
close