shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेवगाव ग्रामीण रुग्णालयात होणार 45 वर्षापूढील नागरिकांचा दुसरा डोस..!!

प्रतिनिधी :आसावरी वायकर

शेवगाव (दि .15 ) : ग्रामीण रुग्णालय शेवगाव याठिकाणी covishield या लसीचे 45 वर्ष व यापुढील नागरिकांसाठी उद्या 15 जून रोजी फक्त दुसरा डोस साठी लसीकरण होणार आहे.

टोकन वाटप आणि नाव नोंदणी सकाळी आठ वाजता चालू होईल.

ज्यांना टोकन मिळाले आहे त्या सर्वांना rt-pcr टेस्ट करणे बंधनकारक आहे .

नगरपरिषद शेवगाव यांनी covid-19 सर्वे साठी नेमून दिलेले अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांचे साठी 50 डोस उपलब्ध आहेत .

45 वर्ष व यापुढील नागरिक दुसरा यांचेसाठी 30 डोस उपलब्ध झाले आहेत .

तरी नागरिकांनी गर्दी करू नये असे शेवगाव ग्रामीण रुग्णालय मार्फत आवाहन करण्यात आले आहे .
close