shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्याभिषेक ..

राज्याभिषेक ..

शिवा  राज्याभिषेक
खुशीत सारे किल्ले
भगव्या रंगा न्हाहले 
नाचे गल्ली मोहल्ले

भगवे  झेंडे  लहरती
आनंदी झाले जिल्हे
स्वराज्याचे स्वप्नगोड
अरे प्रत्यक्षांतआल्ले

भेटवस्तू उस्फुर्त त्या
भरले तिजो-यागल्ले
समानतेच्या तराजूत
निर्भेळ सुख  तोलले

दगड धोंडे न् कपारी
जयकार सारे बोलले
वारा सुगंधीत झाला
दिशांनी गाणे गायले

आवाज पोचे दिल्ली
मुगलसाम्राज्य हलले
शत्रुला असेल वाटले
उगाच केले बा हल्ले 

अभिषेक करता जल
रे स्वतःचं  धन्य झाले
क्षण अविस्मरणीय ते
इतिहासा अमर  केले

- हेमंत मुसरीफ पुणे.
   9730306996
  www.kavyakusum.com

2)

सम भाव .

सर्व  धर्म  सम  भाव
शिवबाचे  होते  रक्ती
सर्व जाती अधिकारी
उच्च पदावर नियुक्ती

सर्वां  घेऊन  चालणे
हीचं चफखल  युक्ती
मावळे विविध रंगाचे
करी  छत्रपती  भक्ती

जपे  प्रत्येक  मावळा
जाणली नस  दुखती
स्वराज्य  पाया साठी
महत्वाची हर  व्यक्ती

सुखी व्हायला हवीयं
खरी  शेवटली व्यक्ती
शब्दात आईची शक्ती
कृतीतशी जशी उक्ती

म्हणूनि जाणता राजा
शोभलास्वराज्य तक्ती
स्वराज्य झालेसुराज्य
लाभली अदभुतशक्ती

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
www.kavyakusum.com

३)
शिव सोहळा  ..

मर्यादित  आमंत्रित 
नियमबद्ध सोहळा 
कोरोनाची  दहशत
यंदा ना  महा मेळा

धांगड  धिंगा नाही 
गर्दी गडबड  टाळा
छानशौक बडेजाव 
खर्चाले लागे टाळा

समारंभ   करताना
पोटा यायचा गोळा
हवसे  गवसे  नवसे
सारे  व्हायचे गोळा 

शिवाभिषेकसोहळा
रक्ता रंघ्रात उमाळा
शिव  मूर्ती  हृदयात 
वरवर ना कळवळा

साधे पणात  सौंदर्य
सुखाचा फुले  मळा
शिस्त लागली छान 
सवय  सदैव  पाळा

कोरोनाची मोगलाई
दुश्मनकायम जाळा
शिवबा  पराक्रमाला
मिळो  खरा उजाळा

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996
www.kavyakusum.com

close