प्रतिनिधी ।आसावरी वायकर :
नगर (दि .३ ) :मानव अधिकार फ़ाउंडेशन, भारत अंतर्गत अहमद नगर जिल्हा महिला अध्यक्ष पदी नगर येथील सौ.अनुरिता पांडुरंग झगडे यांची निवड करण्यात आली आहे .
सौ. अनुरिता पांडुरंग झगडे
मानव अधिकार फाउंडेशन, भारत अंतर्गत समाजातील सर्व मानवी उत्पीडीत घटकांना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम तसेच या कार्यात एकनिष्ठ राहून संविधानिक व न्याय व्यवस्थेच्या नियमांनुसार मदत करणे आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यास कायम कर्तव्य दक्ष रहाणे महत्वाचे असते .
दि .२९ मे रोजी झगडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून अध्यक्ष श्री .प्रमोद फूलसुंदर महाराष्ट्र प्रदेश आणि सौ .सुनिता गोडसे महासचिव महाराष्ट्र प्रदेश यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .
सौ .अनुरिता झगडे या बारा बलुतेदार महासंघ अहमदनगर च्या महिला जिल्हा अध्यक्ष ,आणि श्री राम कृष्ण क्रेडिट कॉपरेटिव सोसायटी अहमदनगर च्या संचालिका असून श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडियम स्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

