हिंगोली / प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) :
दि.८,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील देवकरवाडी गावाची परभणी मधून हिंगोली जिल्ह्याचे विभाजन होऊन २२ वर्ष झाली पण अजून ही ६०० लोकवस्ती असलेल्या गावाची महसुली नकाशावर नोंद नाही.
सेनगाव तालुक्यातील जवळा बु ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गावात जवळपास ४०० च्या वर मतदार आहेत. आणि ६००ते ७०० लोकसंख्या असलेलं गावं पण विकासापासून दुर्लक्षित असलेलं हे गावं देशाच्या नकाशावर दिसत नाही स्थानिक लोकप्रतिनिधी यांची उदासीनता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हे गाव महसुली दर्जा मिळण्यापासून कित्येक दिवसापासून वंचित आहे.
विविध समाजातील लोक येथे राहतात पण मागासलेल्या भागातून येणाऱ्या या गावाच्या लोकांकडे नेहमी दुर्लक्षच झालं नकाशावर नोंद नसल्यामुळे विकासकामे होण्यासाठी नेहमी अडचणी येतात दुसऱ्याच्या वेदना समजण्यासाठी स्वतःच्या अंगी संवेदना असाव्या लागतात. देश स्वातंत्र्य होऊन एवढा काळ लोटला असताना असल्या गोष्टी कडे दुर्लक्ष होतेच कसे हा पडलेला प्रश्न , गावातील रस्त्याची दुरवस्था ,मागासलेल्या लोकांना राहण्याची व्यथा ,शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव असल्या अनेक अडचणी असलेल्या या गावाचा कायापालट कधी होणार हा पडलेला प्रश्न ,गावतील अनेक तरुण शिकले MBBS झाले पण विविध क्षेत्रांत कार्य करत गेले पण सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं आणि हक्काने आपल्या गावाची ओळख सांगताना त्यांचं गावं नकाशावर नसल्यामुळे लोकांची अडचण होते राज्याच्या महसूलमंत्र्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी आता मागणी करत पाठपुरावा सुरू केला आहे त्याला यश कितपत मिळते हे पाहणे गरजेचे आहे जवळा बु तलाठी सज्ज अंतर्गत येणाऱ्या गावाला महसुली दर्जा मिळावा यासाठी सरकार दरबारी अनेक वेळा प्रयत्न केला पण यश आले नाही येणाऱ्या काळात परमेश्वर इंगोले यांच्या मागणीचा विचार होऊन लवकर देवकरवाडी गावाला महसुली दर्जा मिळावा ही मागणी जनतेतून जोर धरत आहे.
शासनाच्या दिरंगाईमुळे अनेक वर्षांपासून देवकरवाडी गावाला महसुली दर्जा मिळण्यासाठी इतकी वर्ष कसरत करावी लागते.संबधीत मंत्री मोहदयाकडे मागणी करुन सुध्दा इतका वेळ लागतो ही खेदाची बाब आहे.स्वातंत्र्य मिळुन किती दिवस झाले तरी सुद्धा देवकरवाडी गाव विकासापासुन वंचीत आहे.येणा-या काळात या देवकरवाडीला महसुली दर्जा न मिळाल्यास गावक-यांना सोबत घेऊन तिव्र आदोंलन उभारले जाईल.
परमेश्वर इंगोले-पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव


