shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तडेगाव येथे ग्रामपंचायत प्रांगणात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा..!

सतिश लोखंडे ( प्रतिनिधी ) : 
भोकरदन : तालुक्यातील मौजे तडेगाव ( वाडी ) ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात दि. ६ जुन रोजी सकाळी ९ वा. शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे तडेगाव येथील उपसरपंच वसीमभाई शेख यांच्या हस्ते पुजन करुन शिवस्वराज्य गूढी उभारण्यात आली.

 याप्रसंगी सरपंच राजुसिंग ब्रम्हणावत ,उपसरपंच वसीमभाई शेख, ग्रामसेवक नेवरे साहेब , तंटामुक्ती अध्यक्ष एम. के. मुगटराव मा.पोलीस पाटील अंकुशराव देशमुख , ग्रामपंचायत सदस्य सुरेश लव्हटे ,इंदलसिंग काकरवाल, मन्नुमहाराज पांडे ,देवसिंग सुंदडे ,समद शेख , भिकाजी पाथरकर, वाल्मिक देशमुख , श्रीरंग पवार , दिनकरराव लव्हटे , बाळु शेळके, गौतम साळवे , संजय गोफणे , अमोल साळवे ,अलीम शेख ,व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close