shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक पाऊल कोरोना योद्धासाठी ....! बुधभुषण फाऊंडेशन चा अनोखा उपक्रम ...!


प्रतिनिधी  । संजय वायकर :

 पूणे : (दि.४) :  बुधभूषण फाउंडेशन आयोजित "एक पाऊल कोरोना योद्धासाठी" या उपक्रमा अंतर्गत श्री सत्यपाल जवाहरलाल परदेशी (कोविड योद्धा)इंचार्ज फार्मासिस्ट पुणे यांनी कोंढवा ,येवलेवाडी पुणे म न पा क्षेत्रातील कोरोना चे 11500  पेशंट बरे करण्यास मोलाची मदत केली आहे .

 या केलेल्या समाज सेवेबद्दल  बुधभूषण फाउंडेशन चे चेअरमन अमोल दुरंदे यांचे हस्ते सत्यपाल परदेशी यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला . 

समाज सेवेचा वसा घेतलेले सत्यपाल परदेशी यांनी कोरोना काळात कोरोना बाधित रुग्णांना सर्वोतोपरी मदत केली . रुग्ण बरे होण्यासाठी अहोरात्र मदत केली . त्यांची समाजा प्रती असणारी आस्था आणि प्रेम पाहूनच त्यांचा सन्मान करण्यात आला.

'एक पाऊल कोरोना योद्धासाठी' या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे .
प्रशासनाने या उपक्रमाची खरोखरच दखल घ्यावी असे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे .

 बुधभूषण फाउंडेशन चे व्हा . चेअरमन दुर्गेश राठोड , सचिव रुपेश लाटे , संस्थेचे विश्वस्थ विशाल जकातदार, वैभव शिंदे, अनिल गोडगे ,लालासाहेब खेडकर, सुखदेव शिंदे ,विकास राठोड , ज्ञानेश्वर शिंदे ,सुधाकर खळदकर यांनी सत्यपाल परदेशी यांचे विशेष कौतुक करून आभार मानले .
close