shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोलापूर ग्रामीण ची सर्व दुकाने खुली करा ...! अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा- स्वामींनाथ हरवाळकर..!!



प्रतिनिधी : संजय वायकर
अक्कलकोट :(दि .४) :
सोलापूर आयुक्तांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे ग्रामीण भागातील सर्व दुकाने तातडीने खुली करावीत अन्यथा रस्त्यावर उतरू असे निवेदन सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितिच्या वतीने स्वामींनाथ हरवाळकर यांनी तहसीलदार अंजली मरोड यांना दिले आहे .
      
श्री स्वामीनाथ हरवाळकर

दुचाकी वरून बी,बियाणे नेणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस मोगलाई दंडाची आकारणी करीत आहेत.सध्या पेरणीचे दिवस आहेत.दुचाकी वर जाणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करू नये असे निवेदनात म्हटले आहे.अक्कलकोट येथील डॉ. ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन मार्फत कोरोनाने मृत रुग्णावर मोफत अंतिम संस्कार करीत आहेत. त्यांना फ्रंटलाइन कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करावे असेही निवेदनात म्हटले आहे.

१० जून पर्यंत निर्णय न झाल्यास संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वामींनाथ हरवाळकर यांनी निवेदनात तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिला आहे. 

यावेळी अस्लम बागवान,अमीर बागवान,महंमद दावणा,मुजमील अन्सारी,ताजुद्दीन शिकलगार,रमेश शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.
close