प्रतिनिधी । आसावरी वायकर :
चिचोंडी पाटील : (दि . ५ ) : ग्रामीण रुग्णालयामध्ये ०५/०६/२०२१ रोजी कोरोना लसीचे ( कोविशील्ड ) १०० + डोस उपलब्ध झालेले असून ४५ वर्षांपुढील ज्या नागरिकांना पहिला किंवा दुसरा डोस घ्यायचा असेल त्यांनी कृपया आधारकार्ड किंवा पॅनकार्ड सह सकाळी 07-30 वा. समक्ष येऊन नोंदणी करून लस घ्यावी असे आवाहन श्री. अशोक कोकाटे यांनी केले आहे .
१८ - ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार नाही.
कोविशील्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्या नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात येईल.

