shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभिजीत पाचोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर तसेच अनाथ आश्रमात खाद्यपदार्थ वाटप..!!


 
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर उत्तरचे जिल्हा सरचिटणीस श्री. अभिजित पाचोरे यांच्या जन्मदिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका यांच्या अथक परिश्रमातून आज शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले होते. 


याकरिता  बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच मुर्त्यूशी झुंज देणाऱ्या अकोला, शिर्डी, रुई, राहाता येथील रुग्णांना तातडीने सहा बॅग रक्त देऊ केले. याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे आशीर्वादरुपी आभार मानले आहे. त्याचप्रमाणे राहाता तालुका प्रहार टीम कडून शिर्डी येथील साई सावली  अनाथ आश्रमात चिमुकल्या बालकांना मिष्टान्न खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार जिल्हा संघटक अभिजित कालेकर, प्रहार तालुकाध्यक्ष राहाता तालुका अध्यक्ष दिनेशराजे शेळके, प्रहार दिव्यांग क्रांती तालुकाध्यक्ष भाऊंनाथ गमे, तालुका उपाध्यक्ष विजय काकडे, दिव्यांग क्रांती उपाध्यक्ष नितीनकुमार भन्साळी, तालुका संघटक वसंत काळे, समनवयक जगन्नाथ सरोदे, निमगाव उपाध्यक्ष सचिन आरने, राहाता शहर प्रमुख अविनाश सनासे उपस्थित होते. तसेच प्रहार सैनिक शिवम पाचोरे, जयदीप सोळशे, प्रथमेश थोरात, मयूर मोरे, महेंद्र मोरे, सतीश लोळगे, अमोल कोते, अजित जगताप, शुभम पाचोरे, आदित्य राहणे, नितीन जगताप, बाळासाहेब गवळी यांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी झाला.
close