shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मन की बात कार्यक्रमाने देशाच्‍या ख-या प्रतिभेची ओळख – डॉ प्रितमताई मुंडे..!!



मन की बातच्‍या ७८ व्‍या कार्यक्रमात खासदार डॉ प्रितमताई मुंडे व आमदार नमिताताई मुंदडा यांची उपस्थिती..!! 
  
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे विविध विषयांवर देशातील जनतेशी हितगुज करतात. या कार्यक्रमाच्‍या ७८ व्‍या भागाचे प्रक्षेपण आज करण्‍यात आले. देशातील कोटयावधी लोकांनी हा कार्यक्रम ऐकला. अंबाजोगाई शहरात स्वर्गीय विलासराव देशमुख नाट्यगृहात हा कार्यक्रम सार्वजनिकरित्‍या साजरा करण्‍यात आला.  

मा. पंतप्रधानांनी आजच्‍या कार्यक्रमात विविध विषयांना स्‍पर्श केला. कोरोना पासून वाचण्‍यासाठी लसीकरण अभियान खुप जोमाने राबवावे असे आवाहन त्‍यांनी देशवासीयांना केले. यासंदर्भात मध्‍यप्रदेशातील एका छोटया गावातील नागरिकांशी संवाद साधत लसीकरणासंदर्भातील त्‍यांचे असलेले गैरसमज दूर करण्‍याचा प्रयत्‍न केला. याशिवाय उत्‍तराखंडमधील पाणी वाचविणा-या पाणी दूताची माहिती, उत्‍तरप्रदेशातील एका गावात खेत का पानी खेत में और गाव का पानी गाव में ही योजना राबविण्‍याची माहिती, श्रीनगर मधील एका व्‍यक्‍तीने आपल्‍या बोटीवर अॅम्‍ब्‍युलन्‍स तयार करून लोकजागरणाचे काम सुरू करण्‍याची माहिती, मध्‍यप्रदेशातील एका छोटया गावातील शेतक-याने निरनिराळया बि-बियाण्‍यांना जपून ठेवले असल्‍याची माहिती त्‍यांनी यावेळी दिली. २१ व्‍या शतकात जन्‍मलेले युवक १९ व २० व्‍या शतकाची माहिती सांगतात तेव्‍हा त्‍यांचे कौतुक वाटते असेही मा. मोदीजी म्‍हणाले.

१९६४ च्‍या टोकियो ऑलिंम्‍पीक्‍स मध्‍ये भाग घेतलेले प्रसिध्‍द क्रिडापटू मिल्‍खा सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्‍यांच्‍याबद्दल गौरवोद्गार काढत मोदीजींनी त्‍यांना श्रध्‍दांजली वाहीली व येणा-या टोकियो ऑलिंम्‍पीक्‍स मध्‍ये भाग घेणा-या खेळाडूंची माहिती देत त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. १ जुलै हा डॉ. बी. सी. रॉय यांचा जन्‍म जयंती दिवस आहे व नॅशनल डॉक्‍टर्स डे आहे. यानिमीत्‍ताने देशातील सर्व डॉक्‍टरांना शुभेच्‍छा देण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. तसेच त्‍या दिवशी चार्टर्ड अकाऊंटन्‍ट डे आहे त्‍यांनाही मोदीजींनी शुभेच्‍छा दिल्‍या. येत्‍या १५ ऑगस्‍ट पासून देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाला सुरूवात होत आहे. ज्‍याला जसे जमेल तसे त्‍याने देशासाठी काम करावे अशी इच्‍छा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

या कार्यक्रमानंतर खासदार ताई यांनी मा. मोदीजींनी अनेक विषयांना स्‍पर्श केल्‍याचे सांगत यापैकी जे जे शक्‍य आहे ते सर्व आम्‍ही करू, अशी ग्‍वाही दिली.  या निमीत्‍याने देशाच्‍या लहान लहान गावातील लोकांनी केलेली मोठी कामे समोर आली व देशाची प्रतिभा कळली असे सांगीतले.

याप्रसंगी आमदार सौ नमिताताई मुंदडा, अक्षय मुंदडा,भाजपच्या प्रवक्ते राम कुलकर्णी,तालुकाध्यक्ष अच्युत बापू गगणे,हिंदुलाल आबा काकडे,रमाकांत मुंडे,डॉ सुधीर धर्मपात्रे,  डॉ अतुल देशपांडे, हनुमंत साने सर,संजय गंभीरे,डॉ पाचेगावकर, कल्याण काळे,प्रशांत अदणक, दैय्वान मुंडे, सुशील माचवे, दिनेश शेप,तालुक्यातील अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
close