shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येवला येथे राऊळ समाज युवक संघटनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून अभिवादन... !


येवला: -  दि. 26 जून रोजी रावळ समाज युवक संघटनेच्या वतीने येवल्याचे ग्रामदैवत असलेले श्रीकालभैरवनाथ मंदिर येथे  राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी समाजातील जेष्ठांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या छायाचित्राचे विधीवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व मिठाईचे वाटप करण्यात आले.
तसेच राऊळ समाजातील  युवकांच्या वतीने गावातील गोरगरीब व गरजू लोकांना कडधान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या लोककल्याणकारी राजाला एक वेगळी मानवंदना देण्यात आली. 

याप्रसंगी युवा कार्यकर्ते संतोष राऊळ यांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल आपले विचार प्रकट केले व लोककल्याणकारी शाहू महाराजांनी शिक्षण, समता, सामाजिक बांधिलकी, कला, खेळ, अस्पृश्य व दलित लोकांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. व सर्वांनी या राजांचा आदर्श घेतला पाहिजे हे सांगितले.

सदर कार्यक्रमास राऊळ समाजातील जगदीश वैद्य, मुकुंद पवार,राकेश राऊळ, सोनू राऊळ, अर्जुन राऊळ, अतुल राऊळ, नचिकेत राऊळ, शिवाजी राऊळ, नवनाथ राऊळ, दत्तात्रय राऊळ,गणेश राऊळ, संतोष मोडवे, रमेश राऊळ, सागर राऊळ आदि युवक उपस्थित होते तर जेष्ठ व्यक्ती श्री. बाळनाथ राऊळ व कैलास राऊळ हे प्रमुख मान्यवर म्हणून लाभले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवकांनी परिश्रम घेतले.
close