आज जागतिक रक्तदाता दिन..!!
रक्तदाना साठी प्रेरित व्हा ... अनुरिता झगडे
प्रतिनिधी : आसावरी वायकर
अ नगर : (दि .१४ ) : देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत.
जागतिक रक्तदाता दिन(१४जून) सगळ्यांना माहीतच आहे रक्तदान किती श्रेष्ठ आहे . रक्तदानामुळे आज कित्येक लोकांना जीवनदान मिळते आहे.
एक खेद जरूर वाटतो की आजही समाजात रक्तदात्यांची संख्या खूप कमी आहे . रक्तदानासाठी प्रेरीत करण्याच्या उद्देशाने व नियमित रक्तदान करणाऱ्या दात्यां विषयी आभार म्हणून जागतिक आरोग्य संघटना २००४ पासून १४ जून जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करत आहे.
मंडळींनो दोन दिवसापूर्वीच वाचनात आले की जो रक्तगट असेल तोच रक्तगटाचा दाता सारख्या रक्तगट असलेल्या रुग्णाला रक्त देऊ शकतो. ( ओ दाता सोडून ) पण मंडळींनो निसर्गाची किमया बघा आईच्या पोटात बाळ जन्माला येते म्हणून आई आणि बाळ यांचा रक्तगट भिन्न असूनही आईचे रक्त बाळाला चालते. आहे की नाही निसर्गाचा चमत्कार खरंच या निसर्गापुढे वैज्ञानिक किमया सुद्धा कधीकधी हात टेकते.
मंडळींनो दाता म्हणजे देणारा काय काय देऊ शकतो आपण या जगात? या निसर्गामध्ये भौतिक गोष्टी मानवाला देऊ शकतो पण कार्यशक्ती थोडी निसर्गाला देऊयात का कसे बघाना झाडे लावूया स्वच्छता ठेवूयात अनाथ प्राण्यांना चालता चालता बिस्किट देऊयात एखाद्या अनाथाला मदतीचा हात देऊयात आज खरोखरच गरज आहे देण्याची अजून काय? एक गोष्ट देणार का प्रॉमिस ह !!! बघा जमलं तर नक्कीच जमेल आपण सारे प्रयत्न करूयात ती गोष्ट म्हणजे फक्त आनंद समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप महत्त्वाचा आहे होय ना!!!
काही नाही करायचे थोडे एकमेकांना समजून घेऊ संघटित होऊन सामाजिक कार्य चळवळीत हातभार लाऊ मग कोणतेही औषधाची गोळी घ्यायची गरज पडणार नाही.
कोणाकडे जुन्या वस्तू चांगले कपडे तसेच काहीही देण्याची इच्छा असेल तर दाता बनूयात आणि सामाजिक बांधिलकी जपूयात.🙏🙏🙏
अनुरिता झगडे
महिला शहर अध्यक्ष
बारा बलुतेदार महासंघ अहमदनगर
संपर्क- 8381007647.

