shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुकास्तरावरील समित्यांना स्थगिती देण्यात यावी – एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन. यांचे महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे केली मागणी..!!

प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:

एरंडोल तालुक्यातील सर्व शासकीय समित्यांमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्थान न मिळाल्याने बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री , महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांना तालुकास्तरावरील समित्यांमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

मागणी निवेदनात विजय महाजन यांनी एरंडोल येथे दक्षता समिती , संजय गांधी निराधार समिती व समन्वय समिती सह सर्व शासकीय समित्या गठीत करण्यात आल्या असल्याचे म्हटले आहे . महाविकास आघाडीत शिवसेना + भारतीय राष्ट्रीय काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या ( ६० + २० + २० ) ठरलेल्या फोर्म्युलानुसार या समित्यांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला एरंडोल तालुक्याला जागा मिळालेल्या नसल्याचे सांगून विनंती केली आहे की उपरोक्त शासकीय समित्यांमध्ये तसेच भविष्यात ज्या समित्या अस्तित्वात येतील त्या समित्यांमध्ये देखील पक्षाचे पदाधिकारी / कार्यकर्त्यांना प्राधान्याने देण्यात यावे तसेच ज्या समित्या गठीत झालेल्या आहे . 

त्यांना स्थगीती देण्यात यावी अशी शेवटी ही विनंती करण्यात आली आहे.
close