shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासनाचे नियम पायदळी तुडवणा-या डाॅक्टरवर कडक कारवाई करण्यासाठी निवेदन- विनोदसिंग परदेशी, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना..!

नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
डॉ.अनिल बोरगे यांचा (दि.२७) में रोजी चा वाढदिवसाचा खुपच गाजावाजा झाला आहे.. त्या दिवशीची घटना म्हणजे महानगरपालिकेच्या इतिहासात काळीमा फासणारी घटना आहे. ती घटना घडलीच तशी...!

सविस्तर वृत पाहुया,  'पल पल पल दिल के पास रहती थी" ... 'एक हसिना थी.. एक दिवाना था" असे भलतेच गाणे गाऊन ते  समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आले. एक जबाबदार  अहमदनगर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे पाहता पाहता नगर मधुन थेट महाराष्ट्र भर प्रसिद्ध झाले. कारण तसेच आहे.‌ 

मा.जिल्हाधिकारी,मा.आयुक्त यांचे कडक आदेश असताना देखील एक वरिष्ठ अधिकारी सोशल डिस्टन्स साथरोग अधिनियम विना मास्क,  संचारबंदी असे अनेक कडक आदेशित निर्बंध असताना देखील आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करून या डाॅ.महाशयाकडून धांगडधिंगा करून गर्दी करण्यात आली. हा वाढदिवस कार्यालयात तसेच  घरात देखील धुमधडाक्यात  साजरा केला होता. 

या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो व्हिडिओ, सोशल मीडिया वर व्हायरल झाल्याने अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी किती बेजबाबदार व निर्लज्ज
पणे वागत आहे. हे पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.

या प्रकरणी प्रहार संघटनेच्या वतीने आयुक्तांकडे जे निवेदन दिले आहे.त्यात अंत्यंत गंभीर असे मुद्दे उपस्थित केले आहेत.या आधी या अधिकार्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप, गैरवर्तनाचे गुन्हे दाखल आहेत. कोरोना महामारी काळात रेमडिसिवीर इंजेक्शन साठ्या बाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल बोरगे यांना इंजेक्शन संदर्भात नोटीस बजावली आहे.पंरतु अजुन हि या नोटिसाला उत्तर न दिल्याचे पुढं येत आहे. 

कोरोना काळात मृत्यू पावलेल्या मृत्युमुखींचे अंत्यसंस्कार मध्ये अनेक घटना समोर आल्या आहेत.एकाच शववाहिकेतुन एकाच वेळी सात आठ मृतदेह वाहतूक करून‌ प्रेतदेहाचे विटंबना करणे. शव वाहिकेतून रस्त्यावर शव पडणे अशा हि  गंभीर घटना घडल्या आहेत. स्वतः दालनांत रेमडिसीवीर बाळगणे, कोरोना भंयकर काळात महिला आशा कामगाराचे वेळेवर पगार न केल्याने अनेक आंदोलने झाली. बोल्हेगाव येथील  महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या घरात जाऊन पाटिॅ करून वय वर्षं १४ अल्पवयीन मुलीला मद्यप्राशन करण्यास भाग पाडुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणे असा गुन्हाही दाखल आहे.आणि घडत आहेत आणि भविष्यात घडतील अशा गंभीर घटना या वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल बोरगे यांनी केलेल्या आहेत.त्यामुळे अशा दंगलखोर डाॅक्टरवर सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

जर का  सदर व्यक्ती कारणे दाखवा नोटीस मधून निर्दोष ‌आढळल्यास   किंवा त्यांच्या अशा कृत्यांना पांघरूण घालून भविष्यात पाठिंबा मिळणार आहे,असे वाटत असेल तर तसे होणार नाही असे अहमदनगर महानगरपालिका आयुक्तांनी प्रहार संघटनेला लेखी स्वरूपात  लिहून देण्याची मागणी केली आहे. जर यदाकदाचित संबंधितावर कडक कारवाई न केल्यास पिडीत कुटुंबीयांना सोबत घेऊन तातडीने अहमदनगर महानगरपालिका समोर सदर अधिकार्याचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे‌.

नगर करांनो सावधान..!
महानगर पालीकेची हीच संस्कृती अशी बळावत चालली तर नगरकरांचे भविष्य अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही...!

या वेळी ह.भ.प  अजय बारस्कर  व राज्याचे प्रवक्ते संतोष पवार,  प्रहार जिल्हा अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारे, जिल्हाउपाध्यक्ष  देवीदास येवले, जिल्हासचिव प्रकाश बेरड आदी पदाधिकार्याच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
close