shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील सारोळाकासार संरपच पद पुन्हा नव्या मोडवर..! आरती रविंद्र कडुस यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा..!!

नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याने संरपच आरती कडुस यांंचे पद जिल्हाधिकारी ‌राजेंद्र भोसले यांनी ‌२२ जानेवारी ‌२०२१ रोजी  रद्द केले होते.नाशिक विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी ५ में रोजी दिलेल्या आदेशात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला कायम ठेवले.त्यामुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी सरपंच पदाचा प्रभारी उपसरपंच जयप्रकाश कडुस यांच्या कडे सोपविण्याचे आदेश दिले होते. 

त्यानुसार ग्रामविकास अधिकारी एस‌.के.कसबे यांनी पदभाराचे पत्र कडुस यांना दिले. अशा सर्व ‌घडामोडी घडल्या नंतर आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने  सारोळा कासार गावच्या संरपच पदी आरती रविंद्र कडुस कायम राहणार असून विभागीय आयुक्तांनी कडुस यांचें संरपच पद रद्द केलेले होते.मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विभागीय आयुक्तांच्या या निर्णयास स्थगिती देत संरपच पदी आरती रविंद्र कडुस हेच कामकाज पाहतील असे स्पष्ट केले आहे. 

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालुच राहणार आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला कडुस यांच्यावतीने न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.यात सुनावणी सुरू असताना न्यायालयाने कडुस यांना मोठा दिलासा दिला आहे.
close