shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अँटिलिया स्फोटके प्रकरणी पोलिस निरीक्षक सुनील माने पोलिस दलातून बडतर्फ..!

नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :

मुंबई  : एनआयएच्या अटकेत असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अखेर मुंबई पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. ॲंटिलिया स्फोटक प्रकरण  आणि मनसुख हिरन हत्याकांडात बडतर्फ झालेले माने हे चौथे पोलिस अधिकारी असून या आधी सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकाराचा वापर करून माने यांना बडतर्फ केले आहे.

सुनिल माने हे ॲंटिलिया स्फोटक प्रकरण उघडकीस आले त्यावेळी गुन्हे शाखा युनिट ८ मध्ये कार्यरत होते. त्यांनी या प्रकरणात वाझेंना मदत केल्याचे समोर येताच त्यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली होती. त्यांचा गुन्ह्यात सहभाग काही दिवसांनी स्पष्ट झाल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली. याप्रकणात अटक झालेल्या सर्व चारही पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

काही तांत्रिक पुरावे व एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना एनआयएने अटक केली होती. एनआयएने त्याबाबतचा अहवालही राज्य गृहमंत्रालयाला पाठवला होते. सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्ष ११ चे माजी पोलीस निरीक्षक होते.

त्यादरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला त्यांनी मदत केली होती. विशेषत: मनसुख हिरेनला वाहनातून रेतीबंदरपर्यंत नेताना त्या वाहनाला सुनील माने यांनी सुरक्षा पुरविल्याचा संशय एनआयएला आहे. त्यानुसार, एनआयएच्या पथकाने माने यांना रेती बंदर येथे नेऊन त्याठिकाणी शोध मोहिम राबवली होती.
close