पिंपरी चिंचवड:-आदित्य जनसेवा सप्ताहचे उदघाटन.-युवासेना प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पिंपरी युवासेनेकडून आदित्य जनसेवा सप्ताह चे उदघाटन दापोडी येथील सरवस्ती अनाथ आश्रमास अन्नधान्य वाटप करून शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक मा. सचिन भोसले ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
ह्यावेळेस नगरसेवक राजू बनसोडे, पिंपरी युवतीसेना प्रतीक्षा घुले, विभागप्रमुख राजू सोलापुरे, मैत्री ग्रुप चे रवीभाऊ कांबळे,ओंकार जगदाळे,अंकुशमामा जाधव, अक्षय गायकवाड, राहुल जाधव,उपस्थित होते. कार्यक्रम चे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी केले होते.

