shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पारेवाडीत शेतकर्यांना मोफत बियाणांचे वाटप..!


नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर‌ शिडिॅ एक्सप्रेस वृत्तसेवा-नगर तालुक्यातील पारेवाडी येथे कृषी विभागाकडुन शेतकऱ्यांना एकरी बावीस  किलो प्रमाणे पंचाहत्तर शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले तसेच पिकाला फवारणीसाठी लागणारे औषधही मोफत देण्यात येणार आहे. असे कृषी अधिकारी मुंजाळ यांनी सांगितले.

यावेळी सरपंच राहुल शिंदे यांनी कृषी विभागाचे आभार मानत या कोरोनाच्या भयंकर आजाराने शेतकरी हवालदिल झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनचे आर्थीक नुकसानही झाले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दिलासा देण्याचे काम केले आहे असे मत व्यक्त केले.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, राजेंद्र गुंड ज्ञानेश्वर शिंदे,ठकाजी शिंदे, जगदीश गुंड वसंत गुंड आप्पा शिंदे प्रमोद शिंदे महेश शिंदे जालिंदर शिंदे ज्ञानदेव गुंड रावसाहेब गुंड बबन शिंदे सर हे सर्व शेतकरी उपस्थित होते
close