shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साकतखुर्द येथे ' शिवस्वराज्य दिन ' साजरा..!

नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये दि. 6 जून रोजी सकाळी स्वराज्य ध्वजासह शिवशक स्वराज्य गुढी उभारून शिव स्वराज्य दिन साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. यानुसार साकत येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी पंधरा फूट उंचीच्या शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्य ध्वज बांधून गुढी उभारण्यात आली. यावर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधून कलश ठेवण्यात आला. अष्टगंध, अक्षदा हळद कुंकू वाहून पूजन करण्यात आले. तसेच राजदंडा सभोवती आकर्षक रांगोळी काढण्यात आली. 

यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी ग्रामसेवक मनीषा सुडके, सरपंच जाईबाई केदारे, प्रभारी पोलीस पाटील दत्तात्रय चितळकर, सेवा सोसायटी अध्यक्ष अशोक शिंदे, भाऊसाहेब निमसे, शरद कार्ले, बापू केदारे, उत्तम शेलार, रामदास चितळकर,  प्राथमिक शाळेच्या शिक्षिका घंगाळे मॅडम, आशा सेविका स्वाती पाठक, ग्रामपंचायत कर्मचारी सिदू केदारे आदी उपस्थित होते. कोव्हीड 19 नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला.
close