कोरोना थोपविण्यासासाठी पोलिसांनी कसली कंबर..!!
प्रतिनिधी : संजय वायकर
अ .नगर (दि.२०) : कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले आणि आयुक्त शंकर गोरे यांनी पुन्हा कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
नगर शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून सोशल डिस्टन्सींग च्या नियमाचे पालन होताना दिसत नाही . विनाकारण गर्दी करणारे लोक पहाता करोना आजारापासून नगरकरांची लवकर सुटका होईल असे वाटत नाही .
परिणामी ही परिस्थिती पहाता नगरमध्ये कड़क कारवाईचे आदेश देण्यात आले. नगर शहरात चितळे रोड याठिकाणी ही मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून विनाकारण गर्दी करणाऱ्या लोकांना समज दिली जात होती .
पो . नि . गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे . कॉ . गणेश चौधरी हे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करताना दिसून आले . तर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना मास्क चा वापर करण्यास सांगितले जात होते . विना मास्क गाडीवर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ही केली जात होती .
यावेळी होमगार्ड सुर्यवंशी , धनगर, सोनवणे , अक्षय कोटा, खेडकर ,आढाव आदि होमगार्ड नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत होते .

