अहमदनगर:-
आमचे परम प्रिय मित्र सतत सामाजिक क्षेत्रात काम करून, समाजाप्रति निष्ठा असणारे व समाजमनावर एक वेगळी छटा उमटविणारे,सडेतोड, निर्भीड, कशाचीही पर्वा न करणारे एक जालिम व्यक्तिमत्त्व कै.दत्ताजी पवार साहेब यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे निधनाचे वृत्त ऐकताच मी व्यतीत झालो. समाजाने एक हरहुन्नरी, सडेतोड व्यक्तिमत्त्व गमावल्यामुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. कै. दत्ता जी पवार साहेब यांच्या कुटूंबावर काळाने आघात केला आहे. त्यांच्या दु:खात शिर्डी एक्सप्रेस परिवार व जेठे परिवार सहभागी आहे.पवार साहेबांना "शिर्डी एक्सप्रेस " व जेठे परिवाराच्या वतीने विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली ..!🙏😭
रमेश जेठे (सर)
संपादक "शिर्डी एक्सप्रेस"
अहमदनगर.

