shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझी उपजीविका समृध्दी मोहिम व माझी पोषण परसबाग विकसन मोहिम प्रशिक्षण पार..!!



नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
दि.२४,व २४  रोजी नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी व शे़ंडी येथे माझी उपजीविका समृद्धी मोहिम व माझी पोषण परसबाग विकसन मोहिम तसेच माझी पोषण परसबाग विकसन मोहिम परसबाग प्रशिक्षण अंतर्गत अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नगर मधील जेऊर जिल्हा परिषद गटा मधील शेंडी गावातील प्रांजल महिला स्वयंसहाय्यता गट शेंडी जिल्हा अहमदनगर  उपजिविका अंतर्गत सोयाबीन चिल्ली व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले  होते. या प्रशिक्षणा साठी पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

या वेळी पंचायत समिती नगर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी कर्मचारी मोलाचे सहकार्य मागदर्शन केले यांचा भविष्यात व्यवसाय साठी नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा बचत गटांच्या महिलांनी व्यक्त केली.प्रशिक्षण वर्गासाठी डॉ.हेमंत वसेकर , मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिलकुमार पठारे सर प्रकल्पसंचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर यांनी गटाला भेट दिली‌ त्यावेळी गटाच्या अध्यक्षा प्रयाग लोंढे,व गटातील महिला व सी,आर,पी, यांच्याशी त्या चालवत असलेल्या सोयाबीन चिल्ली या व्यवसाय प्रशिक्षण व अभियान बाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शन केले.

 या वेळी उपस्थित गव्हाणे साहेब तालुका व्यवस्थापक ,(SLLBCB) सरोदे साहेब,(BMFI)धनवटे,(BMMIS)वैभव मोहिते, प्रभाग समन्वयक वृषाली नवले,प्रभाग समन्वयक सोनाली शिंदे, सोमनाथ जगताप, जिल्हा अभियान व्यवस्थापक मंजुषा धिवर, जिल्हा व्यवस्थापक आव्हाड सर, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अहमदनगर वाणी सर, संरपच गुंड, उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत शेंडी , ग्रामविकास अधिकारी अटकर, पंचायत समिती नगर एम.एस.आर.एल.एम. टीम व. बी .एम प्रभाग समन्वयक तसेच सी.आर.पी ताई बँक सखी गटातील महिला उपस्थित होत्या.
close