shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विरोध झाला म्हणून चळवळ थांबणार नाही : सानप..!!

नगर :  उपेक्षित समाजाला संघटित करून त्यांच्या हक्कासाठी सुरु झालेली हि चळवळ विरोध झाला म्हणून थांबणार नाही. कारण आमची चळवळ कोणाच्याही  विरोधात नाही, कोणाच्याही हक्कावर आम्ही गदा आणणार नाही. पण, आम्हा हक्क जर कोणामुळे हिरावून  घेतला जर असेल तर तो प्रश्न  का मांडू नये असा सवाल ओ. बी. सी. व्ही जे एन टी जनमोर्च्याचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केला.

ओ बी सी ,व्ही जे एन टीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना संघटनेचे  अध्यक्ष बाळासाहेब सानप.समवेत शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नगरसेवक बाळासाहेब बोराटे , मा. नगरसेवक सुनिल भिंगारे, डॉ. सुदर्शन गोरे, अनुरिता झगडे आणि रजनी ताठे आदी. (छाया : देवीप्रसाद अय्यंगार) 


नगर शहर जिल्हा शाखेच्या बैठकीला श्री . सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  नगर शाखेचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते.

सनदशीर मार्गाने विरोध करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू मात्र त्यांच्या पुढे नाहक  झुकणार नाही. असे स्पष्ट करून तेपुढे म्हणाले या चळवळीतील नेते कार्यकर्ते विविध राजकीय पक्षातील आहेत. त्यांच्या पक्षनिष्ठे  बद्दल आक्षेप नाही पण, चळवळीत काम करतांना पक्ष बाजूला ठेवा. संघटनेत काम करतांना कोणालाही यत्किंचितही घाबरू नका आणि लाचार तर अजिबात होऊ नका.ध्येयाने आणि उपेक्षितांसाठी लढतांना घाबरून कसं चालेल? आपलं आरक्षण टिकवायचं आहे ना? ज्यांना मिळालं नाही त्यांना मिळवुन द्यायचं आहे ना? त्यांना आधार द्यायचा प्रयत्न तर करूच, उपेक्षित समाजातील विविध जाती एकत्र करतांना कुठे माहित होतं कि असे दिवस येतील? याला सामोरे गेले पाहिजे,हतबल होऊन चालणार नाही. हा लढा चालूच ठेवावा लागेल. जिल्ह्यात ओ बी सी व्ही जे एन टी चळवळ बळकट कारण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. समाजासाठी काम करतांना पद,मान-सन्मान,प्रसिद्धी याला फाटा द्या. उलट शिस्त,संयम, निष्ठा यावर भर दिला तर या गोष्टी आपसूकच येतात.त्यामुळेचे या गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे.                          

लोणावळा चिंतन शिबिराची दखल शासनाने घेतली. ओ बी सी च्या जात निहाय जणगणने साठी आयोग नेमण्यात आला आहे ते या लढाईचे यश आहे  असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी श्री भुजबळ, नगर सेवक बाळासाहेब बोराटे, मा. नगरसेवक सुनील भिंगारे, संघटनेचे सरचिटणीस रमेश सानप, मा. नगरसेवक अशोक दहिफळे, डॉ. सुदर्शन  गोरे, अनुरिता झगडे यांचे समयोचित भाषणे झाली.  

जनमोर्च्याचे संस्थापक अध्यक्ष श्री सानप यांनी राज्यात संघटना बांधतांना मोठे परिश्रम घेतले.आयोजक असून व्यासपीठावर न जाता सर्वसामान्यांबरोबर ते भूमिका बजावतात या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,तर मंत्री विजय वड्डेटीवार यांचा ओ बी सी व्ही जे एन टी चे हृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला.      

प्रसंगी भिंगार छावणी मंडळाचे मा.सदस्य नामदेव लंगोटे, डॉ.चेमटे ,संजय सागावकर,कैलास दळवी, फिरोज खान, नईम शेख , प्रकाश सैंदर, जालिंदर बोरुडे, रजनी ताठे, श्री.पालवे, राजेंद्र पडोळे, शशिकांत पवार आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक राजेश सटाणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील भिंगारे यांनी केले.

close