shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तमाशा कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी शासन दरबारी - सुधीर वैरागर..!!

प्रतिनिधी मोहन शेगर: महाराष्ट्रातील तमाशा फड मालक आणी तमाशा कलावंत यांना आर्थिक मदतीची मागणी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी महाराष्ट्रा शासनाकडे पाठविली असल्याची खात्रीपूर्वक माहीती फुले-शाहू-आबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी दिली,

     


या संदर्भात आधिक माहीती देताना सुधीर नाथा वैरागर यांनी सागितले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या आजाराचे तमाशा फड बंध झाले असुन तमाशा कलावंतावर उपास मारीची वेळ आलेली असली  तरी महाराष्ट्र शासनाने अद्याप पर्यत कोणतीही आर्थिक मदत तमाशा कलावंताना दिलेली नसल्याने जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी अर्थिक मदतीची मागणी कक्षअधिकारी महसुल व वन अपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय तसेच कक्षअधिकारी सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय यांना कळविली असुन मानवतेच्या दृष्टिकोनातून या कलावंताना अर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आसल्यचे सुधीर नाथा वैरागर यांनी नमूद केले आहे.

लोककलेचे अश्रू जात्यावरच्या वोवीने महाराष्ट्र जागा केला आणी तमाशा कलावंताच्या मराठमोळ्या लोककलेने तो जागता  ठेवला त्या तमाशा कलावंतांचे अश्रू पहावत नाहीत,   

सुधीर नाथा वैरागर  ( बहुजन नेते).

close