सोमवार दिनांक १२, रोजी तालुक्यातील वांबोरी येथे वांबोरी ते औरंगाबाद हायवेपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ राज्याचे नगरविकास, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री तसेच राहुरी, नगर, पाथर्डी मतदासंघांचे लोकप्रतिनिधि नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांचे हस्ते झाला.
वांबोरी परिसरातील गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या नगरला जोडणारा हा मूलभूत रस्ता असल्या कारणाने नागरिकांच्या भावना या रस्त्याशी जोडल्या गेल्या होत्या. या रस्त्याने वांबोर आणि परिसरातील व्यापारी तसेच, विद्यार्थी, पर्यटक असंख्य शेतकरी या रस्त्याने ये जा करतात. अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करत तीन टप्प्यात या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. दुर्दैवाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे काम पुन्हा लांबणीवर गेले. मात्र लोकभावनेचा आदर करत वेळ न दवडता आता ह्या रस्त्याचे काम प्राधान्याने सुरू करण्यात येणार असल्याचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा रस्ता असल्याने अत्यंत दर्जेदार काम व्हावे तसेच या रस्त्याचे काम करत असतांना जशी वर्क ऑर्डर आहे, तसेच काम प्रत्यक्षात झाले पाहिजे अशी तंबी या वेळी नामदार तनपुरे यांनी पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना दिली आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर व दर्जेदार होईल यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे मंत्री तनपुरे म्हणाले.
_वांबोरी ते अहमदनगर रस्त्याचे काम अतिशय भरभक्कम झाले पाहिजे या अगोदर ठेकेदार लोकप्रतिनिधींना भेटत असतील, परंतु आता ठेकेदार यांनी मला भेटायला नाहि आले तरी चालेल तसेच त्यांनी मला भेटावे असा आमचा आग्रह कधीही नाहि परंतु कामामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड खपून घेतली जाणार नाही काम सुरु झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या कामावर ईस्टमेट प्रमाणे काम होते की नाहि ?.... यावर लक्ष द्यायचे आहे नाहीतर अधिकाऱ्यांनाच नोटीस काढल्याशिवाय मी सोडणार नाही असेही नामदार तनपूरे यांनी सांगितले" यावरून नामदार तनपूरे यांच्या प्रत्येक कामात कीती पारदर्शकता आहे हे स्पष्ट होते.
_ यावेळी बाबासाहेब भिटे, सुरेश शेठ बाफणा, एकनाथ ढवळे, केरू पानसरे, ऋषिकेश मोरे, नितीन शेठ बाफणा, किसन जवरे,उपसरपंच सौ. मंदाताई भिटे,ईश्वर कुडमुडे, गोरक्षनाथ वेताळ,कृष्णा पटारे, किसन पागिरे ,संभाजी पागिरे, बंटी वेताळ, विशाल पारख, शैलेश काळे, उद्धव कैतके, शैलेश पागिरे आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क
दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी
(तालुका प्रतिनिधी )7350591600

