shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रबोधनात्मक सायकल वारी करणारे परभणीचे डॉ. चांडक ,वासलकर, सेवलकर यांची इंदापूर येथे कैलास कदम व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न..!!

प्रबोधनात्मक सायकल वारी करणारे परभणीचे डॉ. चांडक ,वासलकर, सेवलकर यांची इंदापूर येथे कैलास कदम व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न..!!
इंदापूर: एड्स,  लोकसंख्या वाढ,पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी   संवाद साधत पुणे आळंदी पंढरपूर संवाद यात्रा दि. १२ जुलै रोजी इंदापूर येथे पोहोचली ही यात्रा गेली आठ वर्षापासून जनजागृती करत सायकल वारी द्वारे परभणीचे डॉ. पवन चांडक, राजेश्वर वासलकर, नितीन सेवलकर हे करीत असून  सध्या कोवीड मुळे दीड वर्षात अनेक समविचारी मित्र सामाजिक, क्रीडा व पर्यावरण प्रेमी यांच्या भेटी शक्य झाल्या नाहीत. अशा परिस्थितीत सर्वांनाच आरोग्य जपणे प्रादुर्भाव झाला असेल तर काळजी असल्यामुळे आर्थिक संकटातून सावरणाऱ्या मित्रांशी संवाद गरजेचा झाला असताना कोरोना नियम पाळून संवाद झाला .तर एक प्रकारे मानसिक ताण भीती दूर होऊन सर्व क्षेत्रातील मित्र पुन्हा तितक्याच जोमाने आपल्या क्षेत्रात नैपुण्य गाजवतील म्हणून पुन्हा परभणीतील एचएएआरसी संस्थेतर्फे दि. ११ जुलै २०२१पासून पुणे आळंदी पंढरपूर व परत परभणी असा संवाद सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असून (दि.१२ जुलै) रोजी ही मोहीम इंदापूर येथे दाखल झाल्यानंतर सर्व मित्रांशी संवाद साधल्यानंतर कैलास कदम व मित्रपरिवार यांच्यामार्फत सायकल स्वरांचा सत्कार करून त्यांना पुढील वारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या आठ वर्षापासून या सायकल स्वार इंदापूर शहरात येत असून यांचा  सन्मान करून जनजागृतीचे उपक्रम राबवला जातो.
यावेळी इंदापूर नगर परिषदेचे गटनेते नगरसेवक कैलास कदम ,सुनील गलांडे, अंकुश डांगे, गफूर सय्यद, रमेश शिंदे, जमीर शेख, आदित्य कदम इत्यादी उपस्थित होते.
close