सृजन नागरी संघर्ष समिती इंदापूर शहर यांच्या वतीने इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांना दिले नागरी समस्यांचे निवेदन..!!
इंदापूर: (१२ जुलै २०२१) रोजी सृजन नागरी संघर्ष समिती इंदापूर शहर प्रभाग क्रमांक एक यांच्या वतीने नागरी समस्या सोडविण्याकरिता इंदापूर नगरपालिका येथे आज (दि १२ जुलै) रोजी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .
या निवेदनात म्हटले आहे की,
सरकारी गोडाऊन ते दत्त मंदिर महात्मा फुले नगर रोड चे काम त्वरित सुरू करावे. दत्तनगर येथील मुख्य रस्त्याचे व जोड रस्त्यांचे काम त्वरित सुरू करावे.
वाढीव हद्दीतील भैरोबानगर रस्ते स्ट्रीट लाईट अंडरग्राउंड ड्रेनेज त्वरित सुरू करावे.सुरेश काळे ते विकास खिलारे घरापर्यंत च्या रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे. तात्पुरता मुरूम टाकून भविष्यात खडीकरण व डांबरीकरण करून घ्यावे.तसेच महती नगर, दत्त नगर मध्ये पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर डबकी साचली आहेत दलदल झाली आहे लवकरात लवकर मुरूम टाकावा तसेच इरिगेशन रोड डॉक्टर धापटे हॉस्पिटल च्या समोर पाण्याची पाईप लाईन लिक असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त गवत वाढले आहे तसेच डिव्हायडर व ओपन जिम जवळचे गवत काढून कालठण रोड रस्त्याकडेची काटेरी झुडपे काढावीत तसेच
शंकर हाउसिंग सोसायटी मधील चोकोप झालेली ड्रेनेज साफ करावे तरी या मागण्या लवकरात लवकर आपण कामे मार्गी लावाव्यात असे नागरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या वेळी माजी नगरसेवक
प्रशांत सिताप, सुधीर मखरे, महादेव लोखंडे ,मुकुंद साळुंखे , विकास खिलारे, बाळासाहेब शिरसागर, खुशाल कोकाटे, लक्ष्मण लोखंडे ,रमेश टुले, श्रीकांत मखरे, तुकाराम कांबळे उपस्थित होते.

