shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१३ जुलै गोमाता कौतुक दिन..!!

अहमदनगर । प्रतिनिधी:

    हम्मा हम्मा ये ग
    बाळाला दूध दे ग
     हम्मा च्या गळ्यात घुंगुर माळा
      बाळाच्या पायात चांदीचा वाळा...

आज 13 जुलै 2021 गोमाता कौतुक दिन. जुलै महिन्यात प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी गोमाता कौतुक दिन साजरा केला जातो.  


आज आपण वेगवेगळे दिवस / 'डे' साजरे करतो किती जणांना आपल्यापैकी माहित आहे की गोमाता कौतुक दिन सुद्धा अस्तित्वात आहे. गोमाते बद्दलची जागरूकता आणि इकोसिस्टीम मधील तिचे महत्त्व समजण्यासाठी हा गोमाता कौतुक दिन साजरा केला जातो. 

आपण गाईला फक्त वसुबारस आणि पोळा याच दिवशी जास्त आठवतो. भारतीय संस्कृती मध्ये पंचक घास पूर्वी दिले जायचे. यातून अर्थ एकच तो म्हणजे वातावरणातील प्रत्येक सजीव घटकाला घास मिळायला हवा. 

काही ठिकाणी आजही गोमातेला चपाती देण्याची परंपरा सुरू आहे. 

मंडळींनो भारत आणि नेपाळ सारख्या देशात गायीला पवित्र मानले जाते. गाईच्या दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तसेच शेणखत व इंधन मिळते. इथपर्यंतच आपणास माहिती असते. पण जर विचार केला तर गाय हा तसा बळकट प्राणी आहे. मानवी इतिहासात गुरेढोरे अनोखी भूमिका बजावत असत. गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते.

गाईचे महत्व काही अध्यात्मिक, धार्मिक, चिकित्सा करण्यासाठी आहे. गाय आपल्या संपूर्ण जीवनात चार लाख दहा हजार चारशे चाळीस लोकांना दूध देते.
 मुनी वशिष्ठ यांनी गाईच्या कुळाचा विस्तार केला. भगवान श्रीकृष्णाने गाय पूजा आणि गौशाळांची निर्मिती त्यावेळेपासूनच केली होती.
 
खूप महत्त्वाची आणि अज्ञात असलेली एक गाई विषयीची गोष्ट म्हणजे गाई मध्ये अत्यंत सकारात्मक ऊर्जा उपस्थित असते. गाईच्या पाठीच्या कण्याचे हाड म्हणजे सूर्य केतू स्नायू असं ज्याला म्हणतात तो वातावरणातील हानीकारक अशा  विकिरणांना थोपवून वातावरण स्वच्छ करतो म्हणजे पहा ही गोमाता पर्यावरणामध्ये किती महत्त्वाची आणि लाभदायक आहे. शास्त्रज्ञांच्या मते गाय हा असा एकमात्र प्राणी आहे जो ऑक्सीजन ग्रहण करतो आणि ऑक्सिजन सोडतो.

    
देशी गाईच्या एक ग्रॅम शेणात 300 कोटी जिवाणू उपलब्ध असतात. जर एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम तुपाचा यज्ञ केला तर एक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. गाईचे शेणही अमृता समान मानले जाते.
    
अमेरिकेमध्ये गाय कौतुक दिनानिमित्त अमेरिकन लोक गाई सारखा पोशाख करून चिक- फिल-ए रेस्टॉरंटमध्ये विनामूल्य भोजन करतात.

    
गाईंमध्ये साहिवाल गाय सर्वाधिक दूध देणारी म्हणून प्रसिद्ध आहे या गाईचा रंग तपकिरी लाल असून तिने सर्वाधिक सहा हजार किलो दूध दिल्याची नोंद आहे. त्याचबरोबर गिर गाय राठी गाय लाल सिंधी यासोबतच महाराष्ट्रात जर्सी गाय फुले त्रिवेणी संकरित गाय आज दूध देण्यात अव्वल आहेत.
 
    
मंडळींनो अशी ही गोमाता आज मात्र गोहत्येकडे जात आहे. थोडा गांभीर्याने विचार करूयात. आणि या गोमातेला आपल्या स्वार्थासाठी वाचवूयात. जमेल का या सकारात्मक ऊर्जेला वाचावायला ?
    
अनुरिता झगडे
बारा बलुतेदार महासंघ
ओबीसी वीजे एनटी जनमोर्चा
जनाधार संघटना
( अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष )
8381007647.
close