प्रतिनिधी : किसन कांबळे
करमाळा : ( दि .१३) : सामाजिक कार्यकर्ते संतोष शेठ कांबळे यांचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचा मानस होता.
मागील महिन्यात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव जास्त असल्या कारणाने तो तूर्तास थांबवला होता. मात्र आज दि .१२ रोजी उंदरगाव येथील ग्रामस्थांच्या डोळे तपासणीचे शिबीर घेऊन संपन्न करण्यात आला.
संतोष शेठ कांबळे यांनी डोळे तपासणी शिबिरास उपस्थित राहणाऱ्यांची मोफत तपासणी केली. सर्व उंदरगाव ग्रामस्थांची मोफत डोळे तपासणी करून संतोष शेठ कांबळे यांनी त्यांचे सामाजिक कार्य पार पाडले.
या शिबिरासाठी एकूण 67 लोकांनी सहभाग नोंदवला . 23 जणांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. तर 5 जणांना पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क येथे पाठवले जाणार आहे .
या कार्यक्रमा वेळी डॉक्टर मोहम्मद ठासरावाला बुधराणी हॉस्पिटल यांनी रुग्णांची तपासणी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिरास सुरुवात करण्यात आली.
या वेळी ग्रामस्थ बापू कोकरे , सागर कुंभार, पत्रकार किसन कांबळे (सर) तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना , जयवंत उर्फ आप्पा कांबळे उपस्थित होते . उंदरगाव शाळेचे मुख्याध्यापक रामहरी ढेरे यांचे सहकार्य लाभले.

